शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
2
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
3
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
4
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
5
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
6
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
7
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
8
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
9
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
10
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
11
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
12
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
13
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
14
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
15
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
16
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
17
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
18
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
19
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
20
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस

कासार्डे बाजार व्यापारी, ग्राहकांमुळे हाऊसफुल्ल

By admin | Updated: February 2, 2015 00:06 IST

विजयकुमार वळंजू : भविष्यात निश्चितच आर्थिक प्रगती होईल, तक्रार नोंदवहीचा अभिनव उपक्रम

नांदगाव : कासार्डेचा बाजार पंचक्रोशीतील लोकांना सोयीचा आहे. ही बाजारपेठ समृद्ध होऊन वाढीस लागावी. पहिल्याच दिवशी मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे भविष्यात हा बाजार अजूनही फुलेल, वाढेल आणि चांगला बाजार म्हणून जिल्ह्यात नावारूपास येईल. यामुळे निश्चितच आर्थिक प्रगती होईल, असे प्रतिपादन जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष विजयकुमार वळंजू यांनी केले. कासार्डे येथे रविवारचा आठवडा बाजार नव्याने सुरू झाला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सरपंच संतोष पारकर, शांतीनाथ लडगे, पंचायत समिती सदस्य संजय देसाई, व्यापारी संघटना अध्यक्ष श्रीपत पाताडे, संजय नकाशे, प्रणिता पाताडे, तंटामुक्त अध्यक्ष दत्तात्रय शेटये, बाळाराम तानवडे, प्रकाश पारकर, नीळकंठ पाटील, चंद्रकांत चव्हाण, सुधाकर रावले, श्रीराम कुडतरकर, पी. एस. पाटील, राजाराम पाटील, वेळगिवे सरपंच संतोष चव्हाण, ओझरम सरपंच प्रदीप राणे, बाप्पी मांजरेकर, मानसी वाळवे, सीमा भांबुरे, प्रवीण पोकळे, दत्तात्रय कल्याणकर, राजू देसाई, राजेंद्र सावंत, संजय पाताडे, श्रावणशेठ बांदिवडेकर, गोपाळ बांदिवडेकर, सुप्रिया पाताडे, श्रीरंग पाताडे, डॉ. अरविंद कुडतरकर, पुंडलिक पाताडे, अमोल जमदाडे, बबन मुणगेकर, सर्व व्यापारी संघटनेचे सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी वळंजू म्हणाले की, कासार्डेत बाजार भरविण्याची प्रथम संधी १९७७ मध्ये मिळाली होती. मात्र, दुर्दैवाने त्यावेळी शक्य झाले नाही. आज त्या संधीची मुहूर्तमेढ रोवली गेली. आज यासाठी दाखविलेली एकजूट याहीपुढे अशीच राहिली पाहिजे. यानिमित्ताने एक सांगेन की, व्यापाऱ्यांनी व्यापार करताना शिक्षणाकडेही लक्ष द्यावे. या बाजारामुळे निश्चितच इतर प्रगती होईल. मात्र, तितकेच शिक्षणाकडेही लक्ष द्यावे. यावेळी संजय देसाई, प्रकाश पारकर, प्रणिता पाताडे, संजय पाताडे यांनी मनोगत व्यक्त केले. (वार्ताहर)अभिनव उपक्रमकासार्डे येथील व्यापारी संघटनेकडून संघटनेच्या कार्यालयात तक्रार नोंदवही ठेवण्यात आलेली आहे. कोणत्याही प्रकारची तक्रार असल्यास ती त्यामध्ये नोंद करावी. त्याची ताबडतोब दखल घेतली जाईल, असे संघटनेकडून सांगण्यात आले. तसेच रविवारी बँक सुरू राहण्यासाठी तसेच एटीएम व त्या अनुषंगाने इतर सोयी-सुविधा उपलब्ध होण्यासाठी संघटनेच्यावतीने प्रयत्न सुरू असून लवकरच या सुविधा उपलब्ध होतील. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार श्रीपत पाताडे यांनी मानले.व्यापाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थितीपहिल्यांदाच भरलेल्या कासार्डे येथील रविवारच्या आठवडा बाजाराला विविध प्रकारची दुकाने घेऊन व्यापारी उपस्थित राहिले. भाजी, किराणा, हॉटेल, सुकी-ओली मासळी, विविध प्रकारचे मसाले अशा विविध प्रकारचे व्यापारी या बाजारासाठी आले. त्याहीपेक्षा जास्त संख्या ग्राहकांची असलेली पाहायला मिळाले. व्यापारी व ग्राहकांच्या लक्षणीय उपस्थितीमुळे पहिलाच बाजार असल्याचे जाणवले नाही.