शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
3
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
4
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
5
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
6
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
7
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
8
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
9
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
10
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
11
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत आवळळ्या मुसक्या   
12
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
13
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
14
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
16
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
17
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीला करा तुळशीचे 'हे' उपाय आणि पूजन, ते ठरेल इच्छापूर्तीचे साधन!
18
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
19
Raj Thackeray Udddhav Thackeray Family Photo : संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
20
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल

परब कुटुंबियांसाठी कारिवडेवासीय एकत्र

By admin | Updated: June 23, 2014 01:31 IST

मदतीसाठी हात सरसावले : प्रियांका चोप्राने मुलीच्या शिक्षणाचा भार उचलला

सावंतवाडी : घरातील गरिबी, त्यातच पतीचे अपघाती निधन आणि पदरात तीन वर्षांची मुलगी, तसेच कुटुंबाचा गाडा हाकताना होणारी ओढाताण करणाऱ्या परब कुटुंबीयांना कारिवडेवासीयांनी मदतीचा हात दिला. त्यांनी परब कुटुंबाला तब्बल १ लाख ८२ हजारांची मदत दिली. तसेच अभिनेत्री प्रियांका चोप्रानेही तिच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी उचलल्याने गावात समाधानाचे वातावरण आहे. दीपक साबा परब यांचा अलीकडचे पनवेल येथे फणसाचा टेम्पो घेऊन जात असताना अपघाती मृत्यू झाला आणि परब कुटुंब रस्त्यावर आले. कर्त्या पुरुषाच्या मृत्यूने गावात एकच हळहळ व्यक्त झाली. दीपक यांची तीन वर्षांची मुलगी तसेच पत्नी यांच्या भवितव्याची काळजी अनेकांना पडली होती; पण गावातीलच सामाजिक कार्यकर्ते मंगेश तळवणेकर तसेच सागर माळकर यांनी पुढाकार घेतला आणि परब कुटुंबीयांची पूर्णपणे जबाबदारी उचलली. सावंतवाडीत तालुक्यात प्रत्येक दानशूर व्यक्तीकडून १०० ते २०० रुपये जमा करून तब्बल १ लाख ८२ हजार रुपये उभे करण्यात आले. यातील १ लाख २० हजार रुपये मृत दीपक यांच्या पत्नीच्या नावावर, तर मुलीच्या नावावर ५० हजार, तसेच दररोजच्या खर्चासाठी बारा हजार रुपये बँकेत जमा करण्यात आले. हे सामाजिक कार्यकर्ते एवढ्यावरच थांबले नाहीत, तर कृषीच्या माध्यमातूनही परब कुटुंबीयाना मदत देण्याचे ठरविले. परब कुटुंबीयांना आणखी एक आधार मिळाला तो चोप्रा कुटुंबीयांचा. दोन वर्षांपूर्वी प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने कारिवडे येथे एक आलिशान घर घेतले आहे. या घराच्या माध्यमातून चोप्रा कुटुंबीयांचे नातेवाईक कारिवडे गावात येत असतात. आठ दिवसांपूर्वी प्रियांका चोप्रा हिची आई कारिवडे येथे आपल्या घरी आली होती. त्यावेळी तिला हा सर्व प्रकार समजला आणि ती एकदम हळवी झाली. मृत दीपक यांच्या मुलीच्या शिक्षणाचा सर्व खर्च आपण उचलणार असल्याचे तिने सांगितले. ती मुलगी शिक्षणासाठी कुठेही गेली तरीही परब कुटुंबीयांना मदत केली जाणार आहे, असे आश्वासनही चोपडा कुटुंबीयांनी दिले. यामुळे परब कुटुंंबीयांचा आधार गेला तरी समाजात अजूनही दानशूर व्यक्ती आहेत. हेच या प्रकारावरून दिसून आले. (प्रतिनिधी)