शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

बांदा येथे दारू वाहतूक करणारा टेम्पो पकडला

By admin | Updated: July 8, 2014 23:19 IST

गोवा बनावटीच्या दारुची बेकायदा वाहतूक

बांदा : मुंबई-गोवा महामार्गावर बांदा-सटमटवाडी येथे गोवा बनावटीच्या दारुची बेकायदा वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या भरारी पथकाने कारवाई करत ७२ हजार रुपये किमतीच्या दारुसह ५२ लाख ९६ हजार ८६७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी चालक सत्यजीत अर्जुन जाधव (वय ३४, रा. पाचंबे-बौध्दवाडी, ता. चिपळुण, रत्नागिरी) याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.ही कारवाई आज पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. टेम्पोच्या पाठीमागील हौद्यात सिपला कंपनीच्या टॅबलेटच्या बॉक्सखाली गोवा बनावटीच्या दारुचे बॉक्स लपविण्यात आले होते. उत्पादन शुल्क खात्याचे जिल्हा अधीक्षक दिलीप मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे प्रभारी निरीक्षक सत्यवान भगत, आर. डी. ठाकूर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी सटमटवाडी येथे सापळा रचला होता. गोव्याहून सावंतवाडीच्या दिशेने जाणाऱ्या टाटा टेम्पोच्या (एमएच ०४ एफडी ३५४६) हौद्यात ठेवण्यात आलेल्या सिपला कंपनीच्या डॉवीर एन टॅबलेट बॉक्सच्या खाली तपासणी केली असता हायवर्ड फाईन व्हिस्कीच्या ७५0 मिलीच्या मापाच्या ब्रॅण्डचे पंधरा बॉक्स आढळले. ७२ हजार रुपये किमतीची दारु जप्त करण्यात आली. चालकावर अटकेची कारवाई करण्यात आली. या घटनेचा अधिक तपास प्रभारी निरीक्षक सत्यवान भगत करीत आहेत. (प्रतिनिधी)