शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

फळांच्या बाजारावरही ‘विदेशी’चा कब्जा

By admin | Updated: January 10, 2015 00:23 IST

खप वाढला : रत्नागिरीकरांच्या जीवनसत्त्व वाढीला परदेशी आशीर्वाद

रत्नागिरी : अननस, कलिंगड, पपईसोबत विविध फळांचे काप एका डिशमध्ये आकर्षक पध्दतीने मांडून विकले जाते. फळांमध्ये असलेली जीवनसत्त्वे शरीरास पोषक ठरतात. त्यामुळे मुंबई, पुणे नव्हे; तर छोट्या मोठ्या शहरातही फ्रूट स्टॉलवर ग्राहकांची गर्दी दिसून येते. देशभरातून विविध प्रकारची फळे बाजारपेठेत विक्रीस येत असली तरी विदेशी फळांनी बाजारपेठेवर कब्जा केल्याचे दिसून येत आहे. इतर बाबींप्रमाणेच फळबाजारावरही विदेशी पगडा असल्याचे दिसून येते.प्रत्येक फळाचा रंग, चवीबरोबर गुणधर्मातही वैविध्य दिसून येते. देशभरात विविध राज्यात फळांचे उत्पादन घेण्यात येत असले तरी परदेशातील अनेक फळे रत्नागिरीच्या बाजारात विक्रीस उपलब्ध आहेत. फ्रूटस्टॉलवाले माल आकर्षक पध्दतीने मांडून ठेवतात. फळाचे काप आकर्षकरित्या मांडून त्यावर चाट मसाला मारून विकण्यात येते. त्यामुळे नोकरदार, व्यावसायिक मंडळी ज्यावेळी डबा नसेल त्यावेळी तर अवश्य फळांचा स्वाद घेतात. जेणेकरून शरीरास आवश्यक असणारी कार्बोदके उपलब्ध होतात.सध्या बाजारात फळे मुबलक स्वरूपात उपलब्ध आहे. नागपूरच्या संत्र्यांबरोबर चीनची संत्रीदेखील विक्रीस आली आहेत. आकाराने लहान शिवाय चवीलाही आंबटगोड असणारी संत्री २०० रूपये किलो दराने विकण्यात येत आहेत. आकाराने लहान असल्याने एका किलोमध्ये भरपूर येतात. त्यामुळे चीनच्या संत्र्यांना रत्नागिरीच्या बाजारपेठेत विशेष मागणी दिसून येत आहे.इटलीचे किवी बाजारात विक्रीस उपलब्ध आहे. चिकूसारखे दिसणारे हे फळही चवीने गोड आहे. ६० रूपये प्रतिनग दराने विकण्यात येत आहे. गुलाबी रंगाचे वॉशिग्टनचे सफरचंद ग्राहकांचे लक्ष वेधून घेतल्याशिवाय राहत नाही. चवीलादेखील गोड आहे. याशिवाय ग्रीन अ‍ॅपल तर फारच सुंदर दिसते. याशिवाय न्युझीलंडचे सफरचंद देशी सफरचंदासारखेच दिसते. मात्र, आकाराने थोडे लांबट आहे. नासपती अर्थात् पेर आंबटगोड चवीचे आहे. देशी पेरपेक्षा न्युझीलंडचे पेर आकाराने मोठे व चवीलाही अप्रतिम आहे. याशिवाय गोड चिंच थायलंडहून आयात केली जाते. ३६० रूपये किलो दराने चिंचेची विक्री सुरू असली तरी पाव किलोचे आकर्षक बॉक्स विक्रीला उपलब्ध आहेत. तसेच इराणचा काळा खजूरही विक्रीस उपलब्ध आहे. ३८० रूपये किलो दराने खजूर विक्री सुरू आहे. परंतु १९० रूपये दराने अर्धा किलोचे खजुराचे आकर्षक बॉक्स विक्रीला उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे डाळिंब, द्राक्ष, काळी सिडलेस द्राक्ष, पपई, कलिंगड, चिकू, मोसंबी, केळी, अननसदेखील विक्रीस उपलब्ध आहेत. सध्या लालबुंद मोठी डाळिंब २२० रूपये किलो दराने विकण्यात येत आहे. द्राक्षाचा हंगाम सुरू झाला आहे. काळी सीडलेस तसेच हिरवी द्राक्षेही विक्रीस उपलब्ध आहेत. चालू हंगामातील सुरूवातीची द्राक्षे असल्याने गोड कमी, आंबटच अधिक आहेत. देशी पपई बाजारात विक्रीला उपलब्ध असला तरी त्याची जात मात्र तैवानी आहे. आकाराने मोठे, हिरवट नारंगी रंगाचे पपई ६० रूपये किलो दराने विकण्यात येत आहेत. पपईमुळे रक्तातील प्लेटलेटस् वाढत असल्याने पपईला अधिक मागणी दिसून येत आहे. कलिंगड उष्णतावर्धक असल्याने कलिंगडाला प्रत्येक सिझनमध्ये मागणी होते, शिवाय ते उपलब्धही होते. गावठी कलिंगड फेब्रुवारी, मार्चपासून उपलब्ध होण्याची शक्यता आहे. चिकू व मोसंबीचा खपही नियमित होत आहे.वेलची केळी ६० रूपये, तर हिरव्या सालीची केळी ४० रूपये डझन दराने विकण्यात येत आहेत. गावठी अननसदेखील विक्रीस आले आहेत. ३० ते ४० रूपये प्रतिनग दराने विकण्यात येत आहे. फळे दिसायला आकर्षक असल्याने ग्राहक चटकन आकर्षिला जातो. (प्रतिनिधी)ग्राहकांकडून विदेशी फळांना मागणीरत्नागिरीतही चवीने खाणारी मंडळी असून, त्यासाठी कितीही पैसे मोजण्याची तयारी दर्शवितात. मुंबई बाजारपेठेत विदेशी फळे विक्रीस उपलब्ध होतात. ग्राहकांच्या मागणीवरूनच मुंबईतून फळे विक्रीस आणू लागलो. पेर, किवी, ग्रीन अ‍ॅपल, ड्रगन फ्रूट, चिंच, सफरचंद, खजूर मागणी होत असल्याने वाशी मार्केटहून विविध प्रकारची फळे मागविताना विदेशी फळेही आयात करतो. विविध कंपन्या तसेच कार्यालयात परराज्यातील अधिकारी, कर्मचारीवर्ग कार्यरत आहे. त्यामुळे या मंडळींबरोबर स्थानिक मंडळीही विदेशी फळांची मागणी करतात. देशी फळांबरोबरच विदेशी फळांचा खप सुरू आहे.- चंद्रकांत श्रीनाथ, फळविके्रेते, मारूती मंदिर, रत्नागिरी.प्रत्येक फळ चवीने, गुणधर्माने वेगळे, वैशिष्ट्यपूर्ण असल्याने त्याला मागणी केली जाते. रमजान व श्रावण हे दोन्ही महिने व्रतवैकल्याचे असल्याने फळांना मागणी वाढते, पर्यायाने किमतीही वाढतात. परंतु फळांसाठी हात आखडता न घेता फळे खरेदी केली जातात. हातगाड्या, स्टॉलवर फळे सर्रास उपलब्ध होत असली तरी विदेशी फळे विकणारे ठराविकच विक्रेते आहेत. - एस. एच. काझी, ग्राहक, रत्नागिरी