शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

महिला उमेदवारांसाठी शोध मोहीम सुरू

By admin | Updated: February 26, 2015 00:13 IST

जिल्ह्यातील एकूण ४७२ ग्रामपंचायतींच्या १४८४ प्रभागांमध्ये ही निवडणूक होणार आहे. यासाठी जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमधील एकूण सदस्य संख्या ३८६१ इतकी आहे.

रत्नागिरी : जुलै २०१५ ते डिसेंबर २०१५ या कालावधीत मुदती संपणाऱ्या जिल्ह्यातील एकूण ४७२ ग्रामपंचायतींच्या होणाऱ्या निवडणुकीसाठी एकूण ३८६१ इतकी सदस्य संख्या असून, त्यापैकी २१६६ इतकी पदे महिला सदस्यांसाठी आरक्षित ठेवण्यात आली आहेत. म्हणजे केवळ १६९५ जागांवरच पुरूष उमेदवारांना हक्क सांगता येणार आहे. महिलांच्या जागा अधिक असल्याने प्रत्येक पक्ष आतापासूनच या उमेदवारांचा शोध घेण्याची मोहीम उभारू लागला आहे. जुलै २०१५ ते डिसेंबर २०१५ या कालावधीत मुदती संपणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका तसेच विविध कारणांनी रिक्त झालेली पदे भरण्यासाठी ग्रामपंचायतीच्या पोट निवडणुका एप्रिल २०१५ मध्ये होणार आहेत. यासाठी निवडणूक कार्यक्रमही जाहीर होणार आहे. त्यामुळे जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी आवश्यक ते कागदपत्र आताच सादर करून हे प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे. जिल्ह्यातील एकूण ४७२ ग्रामपंचायतींच्या १४८४ प्रभागांमध्ये ही निवडणूक होणार आहे. यासाठी जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमधील एकूण सदस्य संख्या ३८६१ इतकी आहे. यामध्ये सर्वसाधारण महिला उमेदवारांची संख्या १८८६ इतकी आहे. तर अनुसुचित जातीसाठी १३२, अनुसुचित जमातीसाठी २१ आणि नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी ५२७ इतक्या आरक्षित जागा आहेत. यापैकी सर्वसाधारण प्रवर्गातील महिला उमेदवारांना जात पडताळणी प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. मात्र, उर्वरित अनुसुचित जात, अनुसुचित जमात आणि नागरिकांचा मागास प्रवर्गातील एकूण ६८० महिला उमेदवारांना जातपडताळणी अनिवार्य असणार आहे. निम्म्यापेक्षा अधिक असलेल्या या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत महिला उमेदवारांसाठी आरक्षणाच्या जागा अधिक असल्याने आत्तापासूनच सर्वत्र महिला उमेदवार शोधण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे. विविध पक्ष आता या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करू लागले आहेत.प्रत्येक तालुक्यात निवडणुका जाहीर झालेल्या ग्रामपंचायतींची संख्या जास्त असल्याने, त्यातील राखीव असणाऱ्या महिलांच्या जागांसाठी आता चाचपणी सुरू करण्यात आली आहे.योग्य महिला उमेदवार देणे, ही प्रत्येक पक्षासाठी कसोटीच ठरणार असल्याने आता यासाठी कुठल्या महिलांना संधी मिळणार, याची उत्सुकता सर्वच तालुक्यांना लागून राहिली आहे. (प्रतिनिधी)जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची संख्या, एकूण सदस्य, एकूण महिला (अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, नागरिकांचा मागासप्रवर्ग, सर्वसाधारण मिळून एकूण तालुकानिहाय) तालुकाग्रा.प.एकूण अनु.अनु. नामाप्र सर्वसाधारणएकूण सदस्य जात जमातमहिलामंडणगड१५११३०७०५१५३७६४दापोली५३४५१०७०६६०१७९२५२ खेड ८७६८१२८०६९४२५६३८४चिपळूण ८३६९३१९०४९२२७३३८८गुहागर २९२३९०३००३३९८१३४संगमेश्वर ७७६१५२९००८३२३४३४६रत्नागिरी ५३४९७२४००७३१७८२७५लांजा २३१७५०७००२३६९९९राजापूूर ५१३९७०८००५४१६२२२४एकूण४७२३८६११३२२१५२७१४८६२१६६