शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

स्फोटप्रकरणी श्वानपथकाला पाचारण

By admin | Updated: July 10, 2014 00:17 IST

बेकायदा जिलेटीन स्फोट प्रकरणी गुन्हा दाखल

बांदा : कास येथील तेरेखोल नदीपात्रात मासेमारीसाठी करण्यात आलेल्या बेकायदा जिलेटीन स्फोट प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, बांदा पोलिसांनी अद्यापपर्यंत एकाही संशयिताला ताब्यात घेतले नाही. घटना घडून दहा दिवस उलटल्यानंतर पोलिसांनी कास येथे श्वानपथकाला पाचारण केल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. मात्र, पाऊस असल्याने श्वान जाग्यावरच घुटमळल्याने पोलिसांना हात हलवत माघारी परतावे लागले.कास तेरेखोल नदीपात्रात घोणसे येथे १ जुलै रोजी जिलेटीनच्या साहाय्याने मासेमारी करीत असताना जिलेटीन हातात फुटल्याने सहा युवक जखमी झाले होते. पोलिसांनी याप्रकरणी किशोर पुंडलिक पंडित घनश्याम शांताराम पंडित, सुभाष उर्फ महादेव भिवा भाईप (सर्व रा. कास) व गुलजार अब्दुल रज्जाक खान, गौरेश मंगलदास काणेकर, लक्ष्मण झिलु सावंत (सर्व रा. बांदा) यांचेवर गुन्हा दाखल केला आहे. यातील किशोर पंडित यांची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर गोवा बांबोळी येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.बुधवारी सकाळी घटनास्थळाची तपासणी करण्याकरीत सिंधुदुर्ग बॉम्बस्फोट स्कॉडच्या ‘रॉकी’ या श्वानाला पाचारण करण्यात आले. घटनास्थळावरील खडकाचा श्वानाला वास देण्यात आला. मात्र, श्वान तेथेच घुटमळले. या परिसरातील काही खडकांचे अवशेष तसेच काही वस्तू तपासी पथकाने ताब्यात घेतल्या. त्यानंतर संशयित सुभाष भाईप व किशोर पंडित यांच्या घराभोवती श्वानाला नेण्यात आले. मात्र श्वान घुटमळल्याने पोलिसांच्या हाती काही लागले नाही. पाऊस सुरु असल्याने तसेच तब्बल दहा दिवसांनंतर पोलिसांनी श्वानपथकाला पाचारण केल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. यावेळी सहाय्यक पोलीस निरिक्षक जयप्रकाश गुठे, श्वान पथकाचे भालचंद्र दाभोलकर, शाशिकांत कदम, दीपक वाणी, एम. डी. बांदेकर, जनार्दन रेवणकर आदि उपस्थित होते. लवकरच या प्रकरणातील संशयितांवर अटकेची कारवाई करणार असल्याचे जयप्रकाश गुठे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)