शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रिपदाचा वापर द्वेषभावनेने केला नाही : केसरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 11:34 IST

सावंतवाडी शहर शांत व सुसंस्कृत आहे. या शहराच्या विकासासाठी आमची धडपड शहरातील नागरिक जाणतात. लोकांची दिशाभूल मी कधीच केली नाही. त्यामुळे राणे बंधूंच्या टीकेला जनता मतपेटीतून उत्तर देईल. मी मंत्रिपदाचा वापर द्वेषभावनेने केला नाही, असा खुलासा माजी पालकमंत्री आमदार दीपक केसरकर यांनी केला. ते सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

ठळक मुद्देमंत्रिपदाचा वापर द्वेषभावनेने केला नाही : केसरकरराणे बंधूंच्या टीकेला जनता मतपेटीतून उत्तर देईल

सावंतवाडी : सावंतवाडी शहर शांत व सुसंस्कृत आहे. या शहराच्या विकासासाठी आमची धडपड शहरातील नागरिक जाणतात. लोकांची दिशाभूल मी कधीच केली नाही. त्यामुळे राणे बंधूंच्या टीकेला जनता मतपेटीतून उत्तर देईल. मी मंत्रिपदाचा वापर द्वेषभावनेने केला नाही, असा खुलासा माजी पालकमंत्री आमदार दीपक केसरकर यांनी केला. ते सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.साळगावकर यांनी राजीनामा दिल्यामुळे ही निवडणूक लागली. आता त्यांनी अपक्ष उमेदवारी न भरता थांबावे. भविष्यात त्यांचे चांगल्या पद्धतीने पुनर्वसन केले जाईल, असाही विश्वास यावेळी केसरकर यांनी व्यक्त केला. यावेळी माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, वसंत केसरकर, बाबू कुडतरकर आदी उपस्थित होते.केसरकर म्हणाले, मी कोणाविषयी शत्रुत्व ठेवून कधीही विरोध केला नाही. ही माझी खासियत आहे. राणेंना राजकीयदृष्ट्या संपवून दहशतवाद संपणार नाही. मात्र त्यांची चुकीची प्रवृत्ती होती. त्याला रोखण्याचे काम मी केले. त्यामुळे तुरुंगात कोणाला वडापाव खावा लागला याचा अभ्यास त्यांनी करावा. छोट्या राणेंनी केलेल्या टीकेवर मी काही बोलणार नाही.केसरकर पुढे म्हणाले, आमचा उमेदवार हा नगरसेवक म्हणून काम केलेला आहे. सामाजिक कामाची जाणीव आहे. त्यांच्यात बोलण्यापेक्षा काम करून दाखवण्याची ताकद आहे. त्यामुळे ते निश्चितच विजयी होतील, असा विश्वास आहे.सावंतवाडी नगराध्यक्ष निवडणुकीत महाविकास आघाडीचा नवा प्रयोग करण्यात येणार आहे. या प्रयोगात सहभागी होणाऱ्या शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या माध्यमातून विकासासाठी भरीव कामगिरी बजावली जावी म्हणून प्रयत्न आहेत असे केसरकर म्हणाले.काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह पदाधिकारी यांच्याशी बोलून विचार करू असे ते म्हणाले. शिवसेना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार खेमराज तथा बाबू कुडतरकर जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. शहरातील जनताजनार्दन यांच्यामुळे विकासासाठी निधी आणला आहे. आता शहराच्या विकासासाठी शिवसेना उमेदवार विजयी करण्यासाठी लोक पुढाकार घेतील, असे केसरकर यांनी सांगितले.

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर sindhudurgसिंधुदुर्ग