शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

विस्थापन होत असेल तर बायपास करा

By admin | Updated: January 12, 2016 00:24 IST

विनायक राऊत : कणकवलीतील बाधित व्यापाऱ्यांची मागणी

कणकवली : चौपदरीकरणामुळे कणकवली शहरातील बाजारपेठ उद्ध्वस्त होणार आहे. यासाठी उड्डाणपूल करताना ४५ ऐवजी ३० मीटर जागेचेच संपादन व्हावे. बाजारपेठेचे विस्थापन होत असेल तर शहरातून महामार्ग नेण्याऐवजी बायपास मार्ग काढावा, अशी मागणी खासदार विनायक राऊत यांच्याकडे शहरातील विस्थापित व्यापारी समितीच्यावतीने सोमवारी करण्यात आली. कणकवलीतील अपंग सहाय्यता तपासणी शिबिराच्या उद्घाटनाला आलेल्या खासदार राऊत यांची चौपदरीकरण बाधितांनी भेट घेऊन निवेदन सादर केले. चौपदरीकरणामध्ये पंधराशे कुटुंबे बाधित होणार आहेत. कणकवली शहरातून महामार्गासाठी ३ किलोमीटर अंतराचा बायपास व्हावा यासाठी २०१२ साली सर्वेक्षण झाले आहे. महामार्गासाठी चौपदरीकरणाचे संपादन झालेले असताना आता सहा पदरी संपादन कशासाठी? असा प्रश्न यावेळी करण्यात आला. याबाबत एकही अधिकारी स्पष्ट माहिती देत नाही. कोल्हापूर शहरातील महामार्गाला बाहेरून बायपास मार्ग दिल्यानंतर त्या ठिकाणी शहर वसले. कणकवलीला हा पर्याय उपलब्ध असताना निष्कारण विस्थापन करु नये.३० मीटरमध्ये सिंगल पिलर उड्डाणपूल होत असेल तर त्याला कणकवलीवासीयांचा विरोध नाही. याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना बाधितांच्यावतीने निवेदन देण्यात आले आहे. गडकरी यांनी बाजारपेठ उद्ध्वस्त होणार नाही, असे आश्वासनही दिले होते. खासदार राऊत म्हणाले की, १४ जानेवारी रोजी चौपदरीकरणाशी संबंधित वरिष्ठ अधिकारी जिल्ह्यात येत आहेत. कणकवली शहरातून उड्डाणपूल व्हावा, असाच प्रस्ताव आम्ही मांडला आहे. कणकवलीतील अधिकारी सध्या कोणतीही माहिती देऊ शकत नाहीत. हरकतींच्या सुनावणीनंतर ‘३ डी’ची नोटीस निघणार आहे. त्यानंतर वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची बैठक होईल. चौपदरीकरणातील बाधितांसाठी नुकसानभरपाईचे प्रमाण ठरलेले असून, होणाऱ्या बैठकीत यावर चर्चा होईल. फेबु्रवारीअखेर चिपळूण येथील महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू होईल तर एप्रिलअखेर कणकवलीत महामार्ग चौपदरीकरण सहा पॅचमध्ये काम सुरू होणार आहे, असे राऊत म्हणाले. (प्रतिनिधी)व्यापाऱ्यांचा इशारा : आंदोलन छेडणारसध्या आरक्षित असलेल्या ३० मीटर क्षेत्रातच सर्व्हिस रोडसह चौपदरीकरणाचे काम व्हावे. अन्यथा शांततेच्या मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा कणकवलीतील व्यापाऱ्यांनी यावेळी बोलताना दिला आहे. जास्तीत जास्त मोबदलाकमीतकमी विस्थापन आणि जास्तीत जास्त मोबदला असे केंद्राचे धोरण असल्याचे खासदार राऊत यांनी सांगितले.