शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

फोंडाघाट हवेलीनगर येथे घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 14:56 IST

फोंडाघाट हवेलीनगर येथील सूर्यकांत बाळकृष्ण सावंत यांच्या घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडत अज्ञात चोरट्यांनी एलईडी टिव्ही, गॅस शेगडी, प्लास्टिक खुर्च्या, लाकडी टीपॉय, चांदीची मूर्ती व रोख ५०० रुपये मिळून १२ हजार ६०० रूपयांची चोरी केली आहे. ही घरफोडीची घटना त्यांचे भाऊ अशोक सावंत घर साफसफाईसाठी गेले असताना २५ जुलै सायंकाळी ४. ३० वाजण्याच्या सुमारास उघड झाली.

ठळक मुद्देफोंडाघाट हवेलीनगर येथे घरफोडीपथक कणकवलीत तपासासाठी दाखल

कणकवली : फोंडाघाट हवेलीनगर येथील सूर्यकांत बाळकृष्ण सावंत यांच्या घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडत अज्ञात चोरट्यांनी एलईडी टिव्ही, गॅस शेगडी, प्लास्टिक खुर्च्या, लाकडी टीपॉय, चांदीची मूर्ती व रोख ५०० रुपये मिळून १२ हजार ६०० रूपयांची चोरी केली आहे. ही घरफोडीची घटना त्यांचे भाऊ अशोक सावंत घर साफसफाईसाठी गेले असताना २५ जुलै सायंकाळी ४. ३० वाजण्याच्या सुमारास उघड झाली.याबाबत कणकवली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सूर्यकांत सावंत हे सेवानिवृत्त असून गोरेगाव मुंबई येथे राहतात. मूळ गाव फोंडाघाट हवेलीनगर असल्याने ते गावी येणार होते़. तत्पूर्वी त्यांनी घराची साफसफाई करण्यासाठी भाऊ अशोक सावंत यांना कळविले. त्यानुसार २५ जुलै रोजी घराची साफसफाई करण्यासाठी अशोक सावंत त्यांच्या घरी गेले. त्यावेळी घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तुटलेल्या अवस्थेत दिसून आला. तसेच दरवाजा उघडा होता़. कपाटातील व घरातील वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या दिसून आल्या़. त्यानंतर त्यांनी सूर्यकांत सावंत यांना फोन केला व माहिती दिली.त्यानुसार सूर्यकांत सावंत शुक्रवारी आपल्या फोंडाघाट येथील घरी आले असता घरातील आठ हजार किंमतीची एलईडी टीव्ही, ८०० रूपयांची गॅस शेगडी, ३०० रूपयांच्या प्लास्टिक खुर्च्या, २ हजार रुपये किंमतीचे लाकडी टेबल, १ हजार रूपयांची चांदीची गणपतीची मूर्ती व रोख ५०० रुपये मिळून १२ हजार ६०० रूपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. कणकवली पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या प्रकरणाचा अधिक तपास कणकवली पोलीस करीत आहेत.पथक कणकवलीत तपासासाठी दाखलकणकवली शहरातील शिवाजीनगर आणि परबवाडी या दोन भागांत गेल्या दोन दिवसांत १० ठिकाणी चोरी झाली़ या घरफोडीतील चोरटा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे़ पुन्हा शुक्रवारी फोंडाघाट येथे चोरी झाली असून चोरीचे सत्र सुरूच आहे़ या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ठसे तज्ज्ञांकडून ठिकठिकाणी ठसे घेण्यात आले आहेत़ शुक्रवारी गुन्हा अन्वेशन शाखेचे पोलीस उपनिरीक्षक फडणीस यांचे पथक कणकवलीत तपासासाठी दाखल झाले होते़ दिवसभर चोरी झालेल्या ठिकाणी घटनांचा आढावा घेऊन तपासाची दिशा ठरविण्यात येत आहे़

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsindhudurgसिंधुदुर्ग