शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गात हळद लागवड क्षेत्र वाढविण्यासाठी लोकसहभागातून बियाण्यांची बँक बनवा - पालकमंत्री चव्हाण 

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: May 29, 2023 17:40 IST

फोंडाघाट येथे २ लाख २० हजार हळद रोपे तयार करण्यात आली

सिंधुदुर्ग : हळदीचे लागवड क्षेत्र जिल्ह्यात वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना हळदीची रोपे, कंद हे योग्य भावात मिळायला हवीत. त्यासाठी लोकसहभागातून बियाण्यांची बँक बनवा, असे निर्देश पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी कृषी विभागाला दिले.जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात हळद लागवड नियोजन बैठक आज घेण्यात आली. बैठकीला आमदार नितेश राणे, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी आमदार राजन तेली, प्रभाकर सावंत उपस्थित होते.प्र. कृषी विकास अधिकारी विरेश अंधारी यांनी संगणकीय सादरीकरण करुन माहिती दिली. सध्या जिल्ह्यात २५० हेंक्टर हळद लावगड क्षेत्र असून, ते २ हजार हेंक्टरवर करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त केले जाणार आहे. शिवाय फोंडाघाट येथे २ लाख २० हजार हळद रोपे तयार करण्यात आली आहेत. पालकमंत्री चव्हाण म्हणाले, शेतकऱ्यांना योग्य भावात बियाणे मिळायला हवीत. चढ्या भावाने त्याची विक्री होणार नाही. यासाठी त्यावर नियंत्रण ठेवा. ‘मागेल त्याला हळद रोपे’ असा उपक्रम सुरु करा. त्यासाठी लोकसहभागातून बँक बनवा. शिवाय मागील वर्षी उत्पादन झालेल्या हळदपूड खरेदीसाठी व्यवस्था करा आणि हळद लागवडीचे जिल्ह्याचे उद्दिष्ट पूर्ण करा, असेही ते म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग