शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
5
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
6
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
7
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
8
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
9
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
10
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
11
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
12
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
13
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
14
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
15
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
16
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
17
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
18
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
19
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
20
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र

अर्थसंकल्पातील तरतुदीमुळे मत्स्यव्यवसाय वाढीस चालना

By अनंत खं.जाधव | Updated: March 23, 2023 19:05 IST

छोट्या-मोठ्या रोजगारांबरोबरच उद्योग-व्यवसायांची देखील वाढ होणार

महेश सरनाईक

सिंधुदुर्ग : नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात कोकण विकासासाठी जवळपास साडेतेरा हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील मत्स्यव्यवसाय वाढीस अधिक चालना मिळणार आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्याला १२१ किलो मीटरचा सागरी किनारा लाभला आहे. यावरील ८७ गावांमधून मासेमारी चालते. २०१६ नुसार ३२ हजार १७ ही मच्छीमारांची लोकसंख्या आहे. एकूण ७ हजार ३०४ कुटुंबे असून त्यापैकी ७ हजार १७४ क्रियाशील मच्छीमार आहेत. जिल्ह्यात मासळी उतरविण्याची ३४ केंद्रे आहेत. तर शासकीय मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र दांडी मालवण येथे आहे. एकूण २३ बर्फ कारखाने असून ३ शीतगृहे आहेत. एकूण परवानाधारक मासेमारी नौका २ हजार ८२६ आहेत. १ हजार ६४६ परवानाधारक यांत्रिक नौका आहेत. तर परवानाधारक बीगर परवानाधारक नौका १ हजार १८० इतक्या आहेत. २३ सागरी मत्स्य सहकारी संस्था असून २६ हजार ७७२ मत्स्य सहकारी संस्थांचे सभासद आहेत. ३८० डिस्ट्रेस अलर्ट ट्रान्समिशन यंत्र असून २१ व्हिटीएस-एआयएस यंत्र आहेत. ३१२ नौकाधारकांना किसान क्रेडीट कार्ड देण्यात आले आहे. निमखारे पाणी खाजणक्षेत्र २ हजार २१६ हेक्टर असून संवर्धनास उपयुक्त क्षेत्र १ हजार २६८ हेक्टर इतके आहे. तटीय जलकृषी प्राधिकरण अंतर्गत ५५ नोंदणीकृत तलाव आहेत. त्यापैकी २८ सुरु आहेत. मासेमारी हक्क असणारे पाटबंधारे तलाव २८ आहेत. ठेक्याने देण्यात आलेले तलाव २५ आहेत. गोड्या पाण्यातील मत्स्य सहकारी संस्था ६ आहेत. २०२९-२० साली मत्स्य उत्पादन १७ हजार ३१२ मेट्रीक टन इतके झाले आहे. कोकणातील नारळ, सुपारी, मिरी,काजू, फणस,आंबा या फळपिकांबरोबरच प्रक्रीया उद्योगाला चालना मिळणार आहेच शिवाय मत्स्यव्यवसाय वृध्दीसाठी मोठा फायदा मिळणार आहे.मोपा हे आंतरराष्ट्रीय आणि बॅ.नाथ पै अशा दोन विमानतळांमुळे पर्यटन जिल्ह्यातील पर्यटनवाढी बरोबरच येथील शेती-मत्स्य उत्पादनाची निर्यात होण्यासही भविष्यात मोठी संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे निश्चितच छोट्या-मोठ्या रोजगारांबरोबरच उद्योग-व्यवसायांची देखील वाढ होणार आहे. अर्थसंकल्पातील तरतुदीचा हा बुस्टर डोस जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला लाभदायक ठरणार आहे. राज्याचा अर्थसंकल्प राज्याच्या विकासाच्या दृष्टीकोनातून फायदेशीर आहेच, विशेषत: कोकणाच्या विकासाला गतीमान करणारा ठरणार आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गfishermanमच्छीमारBudgetअर्थसंकल्प 2023