शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

कोकण रेल्वेला पुन्हा ब्रेक

By admin | Updated: August 26, 2014 23:10 IST

करजाडीतील ट्रॅक कमकुवत : अनेक रेल्वे स्थानकांमध्येच; प्रवाशांचे हाल

रत्नागिरी : कोकण रेल्वेमार्गावर करंजाडी येथे मालगाडीचे डबे घसरलेल्या ठिकाणचा ट्रॅक कमकुवत झाला असल्याने आज, मंगळवारी कोकण रेल्वेच्या वाहतुकीला पुन्हा फटका बसला. त्यामुळे अपघातानंतर २७ तासांनंतर मार्गावरील सुरू झालेल्या वाहतुकीला पुन्हा ब्रेक लागला. मुळातच अनियमित वेळेत धावत असलेल्या गाड्या दुपारनंतर थांबवूनच ठेवल्या गेल्या. मुळात आजही मार्गावरील अनेक रेल्वेगाड्या नियोजित वेळेपेक्षा दोन ते नऊ तास उशिराने धावत होत्या. त्यात करंजाडी येथील समस्येमुळे प्रवाशांचे अधिकच हाल झाले.२४ आॅगस्टला झालेल्या अपघातामुळे कोकण रेल्वेमार्ग ठप्प झाला होता. २५ रोजी सकाळी आठ वाजता मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र गेल्या दोन दिवसात कोकण रेल्वे मार्गावरील सर्वच गाड्यांचे वेळापत्रक बिघडले आहे. आज सकाळी मुंबईतून सुटणारी जनशताब्दी एक्स्प्रेस गाडी सायंकाळी सात वाजता खेडमध्ये पोहोचली. ती सकाळी ११.१५ वाजता रोज रत्नागिरीत येते. त्यामुळे या गाडीच्या प्रवाशांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे.करंजाडी येथे जिथे मालगाडीचे डबे उलटले होते, तेथे ५०० मीटर ट्रॅक कमकुवत झाला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. एकतर तेथून रेल्वे अतिशय संथगतीने न्यावी लागते आणि एखादी रेल्वे तेथून गेल्यानंतर तातडीने ट्रॅकचे काम करावे लागत आहे. त्यामुळे दुपारी पावणेचार वाजता रत्नागिरी स्थानकात आलेली मांडवी एक्स्प्रेस जवळजवळ साडेचार तास रत्नागिरी स्थानकातच थांबवून ठेवण्यात आली. केवळ मांडवी एक्स्प्रेसच नाही तर इतरही अनेक गाड्या वेगवेगळ्या स्थानकांमध्ये थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, रेल्वे प्रशासनाकडून नेमकेपणाने कसलीच माहिती दिली जात नव्हती त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. (प्रतिनिधी)