शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

मासेमारीसाठी ‘बीआरडी’ पद्धत

By admin | Updated: January 12, 2015 21:47 IST

मत्सिकी प्रौद्योगिकी संस्थान : दुर्मीळ मत्स्य प्रजातींचे होणार संवर्धन

संदीप बोडवे- मालवण -ट्रॉलिंग मासेमारीमुळे सागरी साधनसंपत्तीवर परिणामी जैवविविधतेवर होणारे आघात कमी करण्यासाठी तसेच दुर्मीळ व नष्ट होत चाललेल्या मत्स्य प्रजातींच्या रक्षणासाठी ट्रॉलिंग मासेमारीमध्ये बीआरडी पद्धत विकसित करण्यात आली आहे. या पद्धतीचा वापर करण्यासाठी यांत्रिकी मच्छिमारांनी पुढे येण्याचे आवाहन मत्सिकी प्रौद्योगिकी संस्थान करत आहे. युएनडीपी प्रकल्पांतर्गत सिंधुदुर्गातील मच्छिमारांसाठी येथील कांदळवन विभागाच्या कार्यालयात एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. त्याला मच्छिमारांनी चांगला प्रतिसाद दिला. या कार्यशाळेत यांत्रिकी मच्छिमारांना या बीआरडी पद्धतीची माहिती देण्यात आली. याची प्रत्यक्ष चाचणी घेण्याची मागणी मच्छिमारांनी केली आहे. यामध्ये जेएफईएसएसडी व एसपीटीएस जाळ्यांचे प्रदर्शन, चौकोनी आसाचे कॉडएण्ड तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. कार्यशाळेत केंद्रीय मत्सिकी प्रौद्योगिकी संस्थान कोचिनचे टेक्निकल आॅफिसर अरविंद कलंगुटकर व वरिष्ठ अनुसंधान अधिष्ठाता परेश खानोलकर यांनी मच्छिमारांना मार्गदर्शन केले. या कार्यशाळेला सिंधुदुर्ग जिल्हा मच्छिमार फेडरेशनचे अध्यक्ष मेघनाद धुरी, मच्छिमार नेते कृष्णनाथ तांडेल, मुनव्वर सोलकर, सादिक पावसकर, शकील मालपेकर, लुईस रॉड्रिक्स, प्रमोद खडपकर, हेमंत मेथर, निकसन काळसेकर, रवींद्र जोशी, इरफान मालपेकर, प्रशांत दुधवडकर, हरेश्वर खवळे, वरिष्ठ अनुसंधान अधिष्ठाता सौरभ साळवी, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)अशी आहे बीआरडी पद्धत...ट्रॉलिंग पद्धतीच्या मासेमारीत मोठ्या प्रमाणावर लहान मासे सापडतात. हे मासे समुद्रात फेकून दिले जातात. अनेकवेळा नष्ट होण्याचा धोका असलेली दुर्मीळ समुद्री कासवे व दुर्मीळ माशांच्या प्रजाती ट्रॉलिंग करताना जाळ्यांमध्ये येतात. या सर्वांना वगळण्यासाठी बायकॅच रिडक्शन डिवायसेस (बीआरडी) ही पद्धत विकसित करण्यात आली आहे. सध्याच्या अतिरेकी पारंपरिक ट्रॉलिंग पद्घतीमुळे २०४८ मध्ये समुद्रातील मासे संपतील, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर सागरी जैव साखळीतील महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या दुर्मीळ मत्स्य प्रजातींचे व समुद्री कासवांचे संवर्धन करण्यासाठी अशा मासेमारीच्या पद्धती विकसित केल्या जात आहेत. या पद्धतीमध्ये जाळ्यांच्या रचनेनुसार लहान अनावश्यक माशांची सुटका होऊ शकते. समुद्री कासवांसारखे जीव त्यातून बाहेर पडू शकतात. ही पद्धती वापरल्याने इंधनाचाही बचत होते.बीआरडी पद्धत मत्स्य प्रजातींच्या संवर्धनासाठी हितकारक आहे. मात्र, या पद्धतीच्या मासेमारीची प्रत्यक्ष चाचणी येथील समुद्रात करावी व स्थानिक मच्छिमारांनाही सोबत घ्यावे. एकाचवेळी पारंपरिक पद्धतीची ट्रॉलिंग फिशिंग व बीआरडी पद्धतीची ट्रॉलिंग फिशिंग करून चाचणी करावी.- कृष्णनाथ तांडेल,मच्छिमार नेते, मालवण. केरळ, गुजरात, तमिळनाडू येथील मच्छिमारांनी प्रयोगिक तत्त्वावर या पद्धतीने या जाळ्यांचा वापर करण्यास सुरूवात केली. तेथील मच्छिमारांना चांगला अनुभव येत आहे. - परेश खानोलकर,वरिष्ठ अनुसंधान अधिष्ठाता,केंद्रीय मत्सिकी प्रौद्योगिकी संस्थान, कोचिन.