शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

शुटींग बॉल स्पर्धेत  बीपीटी मुंबई अ संघाला विजेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 14:57 IST

देवगड येथील हनुमान युवक क्रीडा मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या शुटींग बॉल स्पर्धेत बीपीटी मुंबई अ संघाने विजेतेपद पटकाविले.

ठळक मुद्देशुटींग बॉल स्पर्धेत  बीपीटी मुंबई अ संघाला विजेतेपददेवगड येथील हनुमान युवक क्रीडा मंडळाच्यावतीने स्पर्धा

देवगड : देवगड येथील हनुमान युवक क्रीडा मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या शुटींग बॉल स्पर्धेत बीपीटी मुंबई अ संघाने विजेतेपद पटकाविले.या स्पर्धेचे उद्घाटन नगराध्यक्षा प्रणाली माने यांच्या हस्ते झाले. विजेत्या बीपीटी मुंबई अ संघाला ५००० रुपये व चषक, उपविजेत्या मुंबई संघाला ४००० रुपये व चषक तर सेमी व्हॉलिबॉल स्पर्धेतील विजेता महादेश्वर संघाला ३००० रुपये व चषक, उपविजेत्या नारिंग्रे संघाला २००० रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले.हनुमान युवक क्रीडा मंडळाच्यावतीने विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांचा निकाल जाहीर झाला. मिठमुंबरी ते देवगड हायस्कूलपर्यंत घेण्यात आलेल्या खुल्या व शालेय फास्ट सायकल स्पर्धेचे उद्घाटन पोलीस निरीक्षक संजय कातिवले यांच्या हस्ते झाले.

  • खुला गट -प्रथम -सोहम गोकुळदास हरम, द्वितीय संजय प्रकाश भुजबळ, उत्तेजनार्थ गणेश महेंद्र ठुकरूल, ओम संदीप कुळकर्णी.
  • शालेय गट -प्रथम सुमुख जगदीश गोगटे, द्वितीय सागर शिवाजी कोळेकर, उत्तेजनार्थ सर्वेश सकपाळ व खुशाल प्रविण कदम. 
  • वैयक्तिक क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन देवगड हायस्कूलचे पर्यवेक्षक माने यांच्या हस्ते झाले. यामध्ये महिला गट १०० मीटर धावणे प्रथम अमिषा विठोबा गोलतकर, द्वितीय आयशा अब्दुल रऊफखान, तृतीय अक्षता उमेश खवळे. २०० मीटर धावणे प्रथम प्रिती अजित पुजारे, द्वितीय आयशा अब्दुल रऊफखान, तृतीय अक्षता उमेश खवळे. ४०० मीटर धावणे प्रथम दुशांती दत्ताराम देवळेकर, द्वितीय सानिका प्रदीप आंबेरकर, तृतीय प्रिती अजित पुजारे यांनी यश मिळविले.
  • लांबउडीत प्रथम अमिषा विठोबा गोलतकर, द्वितीय अक्षता उमेश खवळे, तृतीय धनश्री शिवानंद चव्हाण तर गोळाफेकमध्ये प्रथम दिशा अनिल मुळम, द्वितीय धनश्री शिवानंद चव्हाण, तृतीय आदिती राजेश कदम यांनी यश मिळविले.
  • पुरूष गट १०० मीटर धावणे प्रकारात प्रथम शिवराज प्रकाश खानविलकर, द्वितीय अक्षय अंकुश अनभवणे तर तृतीय क्रमांक नितीश अजित चौकेकर यांनी यश मिळविले.
  • २०० मीटर धावणे प्रथम अक्षय अंकुश अनभवणे, द्वितीय प्रणय लवू अनभवणे, तृतीय नितीश अजित चौकेकर.
  • ८०० मीटर धावणे प्रकारात प्रथम प्रसाद दिनकर नरसाळे, द्वितीय जितेश जनार्दन कोयंडे, तृतीय रोहित रवींद्र ठुकरूल यांनी यश मिळविले.
  • लांबउडीत प्रथम प्रणय लवू अनभवणे, द्वितीय अक्षय अंकुश अनभवणे, तृतीय अजय अनिरूध्द अभ्यंकर यांनी तर उंचउडीत प्रथम अजय अनिरूध्द अभ्यंकर, द्वितीय दीपराज दामोदर मेस्त्री व उत्तेजनार्थ संदेश राजेंद्र कदम, विराज दशरथ मुळम यांनी यश मिळविले.
  • गोळाफेक प्रथम दीपराज दामोदर मेस्त्री, द्वितीय अक्षय अंकुश अनभवणे, तृतीय साहील सत्यवान मेस्त्री
  • रस्सीखेच स्पर्धेत महिला गट प्रथम जय कुणकेश्वर (अ), द्वितीय जय कुणकेश्वर (ब) तर तृतीय देवगड हायस्कूल व पुरूष गटात प्रथम उमा मिलिंद पवार इंग्लिश मीडियम स्कूल, द्वितीय देवगड हायस्कूल (अ), तृतीय देवगड हायस्कूल (ब) यांनी यश मिळविले. 

बक्षिस वितरण कार्यक्रमाला मंडळाचे माजी अध्यक्ष मोहन शिनगारे, खजिनदार हनिफ मेमन, अध्यक्ष विलास रूमडे, उपाध्यक्ष उल्हास मणचेकर, सेक्रेटरी शरद लाड, माजी अध्यक्ष विजय जगताप, भाई सावंत, श्रीकृष्ण मेस्त्री, द.ना.चव्हाण, रामदास जगताप, उमेश बिडये, राजू जगताप आदी उपस्थित होते.प्रास्ताविक सुरेंद्र लांबोरे यांनी केले. सूत्रसंचालन शरद लाड यांनी केले तर आभार विलास रूमडे यांनी मानले. सर्व बक्षिसे पारकर फिशरीज, डॉ. योगेश भिडे, सुनील कुळकर्णी, ओमटेक असोशिएट्स, द्विजकांत कोयंडे, सतीश सकपाळ यांनी पुरस्कृत केली होती.विजेत्यांचा पारितोषिक देऊन गौरवशुटींग व्हॉलिबॉल स्पर्धेतील नारिंग्रे संघ, वाडेगती बांदेवाडी, फटोबा पडवणे, वेंगुर्ला मातोंड या चार संघांना प्रत्येकी एक हजार तर एम्.बी.पी.टी संघ (ब), गांगेश्वर तळेरे या संघांना प्रत्येकी पाचशे रुपये उत्तेजनार्थ पारितोषिक देवून गौरविण्यात आले. वैयक्तिक क्रीडा व व्हॉलिबॉल स्पर्धा देवगड हायस्कूलच्या क्रीडांगणावर खेळविण्यात आल्या.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग