शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

बांदा-सटमटवाडीत माकडतापाने दोघांचा मृत्यू

By admin | Updated: March 3, 2017 23:33 IST

बांदा-सटमटवाडीत माकडतापाने दोघांचा मृत्यू

बांदा : सटमटवाडी येथील वासुदेव मधुकर परब (वय ५०) आणि संतोष मंगेश मांजरेकर (५५) यांचा माकडतापाने उपचारादरम्यान बांबोळी येथील रुग्णालयात उपचार सुरूअसताना शुक्रवारी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. डिसेंबर अखेरपासून बांदा परिसरात माकडतापाचे एकूण ३० रुग्ण आढळले आहेत.एकूण चारजणांचा तापाने बळी घेतल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. पुणे येथील आरोग्य सहसंचालकांनी परिसराला व आरोग्य विभागाला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला होता. पहिल्यांदा बांदा-सटमटवाडी, डिंगणे या परिसरात माकडतापाचे रुग्ण आढळले. तद्नंतर याचे लोण बांदापर्यंत पसरले आहे. बांदा-सटमटवाडी येथे वासुदेव परब आणि संतोष मांजरेकर काही दिवसांपासून तापाने आजारी होते. बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचारादरम्यान त्या दोघांना दाखल केले होते. त्यावेळी त्यांच्या रक्ताचा नमुना तपासणीसाठी पाठविला असता तो पॉझिटिव्ह आला. त्यांच्यावर बांदा येथे उपचार सुरू असताना प्रकृती साथ देत नसल्याने दोघांना गोवा, बांबोळी येथे बुधवारी रात्री हलविण्यात आले. गोवा येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, त्यांची प्रकृती उपचारांना साथ देत नसल्याने अतिदक्षता विभागात उपचार सुरू ठेवले. मात्र, शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास संतोष मांजरेकर यांचा मृत्यू झाला. तर साडेसातच्या सुमारास वासुदेव परब यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. संतोष मांजरेकर यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार असून, ते शेती बागायती करून उदरनिर्वाह करीत होते. वासुदेव परब यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार असून तेही शेतीची कामे करीत होते. (प्रतिनिधी)