शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
6
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
7
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
8
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
9
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
10
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
11
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
12
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
13
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
14
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
15
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
16
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
17
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
18
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
19
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
20
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ

बॉर्डर परिषद पुन्हा सुरू करणार

By admin | Updated: February 1, 2015 00:35 IST

राम शिंदे : अधिकारी बदलला तरी मोबाईल नंबर तोच हवा

सावंतवाडी : सिंधुदुर्गच्या सीमेवर असलेल्या कर्नाटक गोवा व महाराष्ट्र या तीन राज्यांची बंद झालेली बॉर्डर परिषद लवकरच सुरू करण्यात येईल, अशी माहिती गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी दिली. सावंतवाडीत पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी ते पत्रकारांशी बोलत होते. माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, नगरसेविका अनारोजीन लोबो, किर्ती बोंद्रे, अफरोझ राजगुरू, शब्बीर मणियार, आदी उपस्थित होते. गृहराज्यमंत्री शिंदे म्हणाले, अधिकारी बदलला तरी त्यांचा मोबाईल नंबर तोच राहिला पाहिजे यासाठी गृहविभाग लवकरच एक प्रस्ताव तयार करणार आहे. याचा फायदा सर्वसामान्य माणसाला होणार आहे. अधिकारी बदलला की त्याचा नंबर बदलतो. त्यामुळे अनेकवेळा तक्रारदारांना येणाऱ्या अधिकाऱ्यांचा नंबर शोधावा लागतो. हे कुठे तरी थांबले पाहिजे, हा यामागचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सीमेवरच्या राज्यातील गुन्हेगार सिंधुदुर्गचा आश्रय घेतात. तर या ठिकाणी कृत्य केलेले गुन्हेगार अवघ्या काही मिनिटात इतर राज्यात जाऊ शकतात. येथील पोलिसांना इतर राज्यातील पोलीस सहकार्य करीत नाही. त्यामुळे बोर्डर परिषद होणे गरजेचे आहे, असे गृहराज्यमंत्री शिंदे यांच्या लक्षात आणून देताच त्यांनी याबाबत माहिती घेईन. ही परिषद का बंद झाली, याची कारणे शोधून लवकरात लवकर ही बोर्डर परिषद होणार असल्याचे यावेळी गृहमंत्र्यानी सांगितले. तंटामुक्ती ही संकल्पना मागच्या सरकारने राबवली असून, या संकल्पनेबाबत नवीन आलेले सरकार विचारविनिमय करीत असून, ही तंटामुक्ती तशीच ठेवायची की त्यांचे नाव बदलायचे आणि त्यात बदल करायचा यांचा निर्णयही घेतला जाईल, असे ही गृहराज्यमंत्र्यानी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)