शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

साबुदाणा लागवड कोकणसाठी वरदान

By admin | Updated: June 13, 2016 00:19 IST

नावीन्यपूर्ण पिकांची गरज : सात महिन्यांत फायदा देणारे पीक

कडावल : शेवरकंद म्हणजे साबुदाण्याच्या झाडांची लागवड कोकणातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरू पाहत आहे. केवळ सहा ते सात महिन्यांचे पीक, साबुदाण्याला बाजारात वर्षभर असणारी मागणी तसेच उत्पादनाला मिळणाऱ्या दरामुळे साबुदाणा लागवड किफायतशीर ठरत असून, आर्थिक सुबत्तेसाठी शेतकऱ्यांनी या लागवडीकडे मोठ्या प्रमाणात वळण्याची गरज आहे. कृषी क्षेत्रातही आता आधुनिकतेचे वारे वाहू लागले आहे. नावीन्यवपूर्ण प्रयोगांद्वारे शेतीच्या विकासाबरोबरच स्वत:च्या आर्थिक संपन्नतेसाठी येथील शेतकरी झटत आहेत. परिणामी येथील शेत शिवार विविध पिकांनी डोलताना दिसत आहेत. कोकणातील हवामान व जमिनीला मानवणारे शेवरकंद म्हणजेच साबुदाण्याच्या झाडांची लागवड फायदेशीर ठरत आहे. आर्थिक सुबत्तेसाठी येथील शेतकऱ्यांनी या नावीन्यपूर्ण पिकाच्या लागवडीकडे वळणे गरजेचे आहे.साबुदाण्याला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे. केवळ सहा ते सात महिन्यांत हे पीक काढण्यास तयार होते. प्रति हेक्टरी सुमारे पंचवीस टन उत्पादन मिळते, तर साबुदाण्याच्या पावडरला बाजारात प्रतिकिलो सुमारे ५५ रुपये दर मिळतो. साबुदाण्याची पावडर घरीच बनविता येत असल्याने शेतकऱ्यांना यापासून गृहद्योगही सुरू करता येतो. एकंदरीत शेवरकंदाची लागवड शेतकऱ्यांना फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे.अखिल भारतीय समन्वित एकात्मिक कृषी संशोधन, योजनेचे अधिकारी तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र डॉ. नामदेव म्हसकर याबाबत बोलताना म्हणाले, शेवरकंद म्हणजे म्हणजे साबुदाण्याच्या झाडांची लागवड कोकणातील शेतकऱ्यांना फायद्याची ठरू शकते. साबुदाण्याला बाजारात वर्षभर मागणी असते. साबुदाण्याची पावडर शेतकरी आपल्या घरीच तयार करू शकतात. या पावडरला दरही चांगला मिळतो. लागवडीसाठी एच-११९, श्री जया किंवा श्री प्रकाश या जातींची निवड करावी, असे आवाहनही डॉ. म्हसकर यांनी केले आहे. (वार्ताहर)शेवरकंदाची लागवड सरी वरंबा पद्धतीने केली जाते. लागवडीसाठी ६ ते १० महिने वयाच्या योग्य वाढ झालेल्या निरोगी झाडांच्या खोडाचे २० ते २५ सेंटिमीटर लांबीचे तुकडे वापरण्यात येतात. लागवड जातीनिहाय ९० बाय ९० सेंटिमीटर किंवा ७५ बाय ७५ सेंटिमीटर अंतरावर करावी. एक हेक्टर लागवडीसाठी सुमारे १२३५० ते १७७८० कांड्या पुरतात. लागवडीनंतर योग्य प्रमाणात खते, पाणी, मशागत, बेनणी तसेच भर देणे, आदी कामे वेळोवेळी पूर्ण करणे आवश्यक आहे.कोकण विभागासाठी एकात्मिक खत व्यवस्थापनात या पिकासाठी हेक्टरी ७.५ टन शेणखत तसेच नत्र:स्फुरद:पालाश अनुक्रमे ७५:५०:७५ मात्रा देण्यात यावी. सोबत २० किलो धैचा बियाणे लागवडीवेळी पेरून भरीच्या वेळी जमिनीत गाडावे.लागवडीनंतर ३० ते ४५ दिवसांनी पहिली बेनणी करून सरीवर रोपांना भर द्यावी. नंतर एक महिन्याने पुन्हा एकदा भर देणे गरजेचे असून, यावेळी खताचा दुसरा हप्ता द्यावा. पिकाला आवश्यकतेनुसार ८ ते १० दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.