रत्नागिरी : विधानसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी पालकमंत्री उदय सामंत यांनी शहरातील ३४ विकासकामांचे भूमिपूजन करीत पाच ठिकाणी या कामांच्या फलकांचे अनावरण केले होते. मात्र, या कामांना पालिकेची मंजुरी नसतानाही लावल्याने भूमिपूजनाचे पाच लोखंडी फलक अतिक्रमण ठरवित पालिकेच्या मालमत्ता विभागाने हटविले आहेत. त्यामुळे ऐन निवडणूक काळात उदय सामंत विरुद्ध पालिका अशी अस्तित्वाची राजकीय लढाई जुंपणार आहे.शहरात आरसीसी गटार बांधणे, चर्चघाटी शाळा क्र. १४ च्या मागील बाजूचा जुना बांध पाडून नवीन बांधणे, शासकीय तंत्रनिकेतनच्या आवारात ४.८० लक्ष लीटर क्षमतेच्या साठवण टाकीची दुरुस्ती करणे, शिवखोल येथे आरसीसी रिटेनिंग वॉल बांधणे यांसारख्या एकूण ३४ कामांचे भूमिपूजन आचारसंहितेपूर्वी सामंत यांनी केली आहेत. यापैकी कोणत्याही कामाला पालिकेकडून कार्यादेश (वर्कआॅर्डर)प्राप्त झालेला नाही. आचारसंहिता लागू झाल्याने कार्यादेश नसलेल्या कामांच्या भूमिपूजनाचे फलक पालिकेने अतिक्रमण ठरवून त्याविरोधात जप्तीची कारवाई केली. त्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.ज्या पाच ठिकाणी हे ३४ कामांबाबतचे फलक लावण्यात आले होते त्यामध्ये एकता मार्ग, राजीवडा, किल्ला, लक्ष्मी चौक व चर्च घाटी या ठिकाणच्या फलकांचा समावेश आहे. हे सर्व फलक हटवून पालिकेच्या मालमत्ता विभागाने आपल्या ताब्यात घेतले आहेत. त्यावरून आता राजकीय वादळ घोंगावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी) सामंत यांनी नौटंकी थांबवावी : महेंद्र मयेकरपालिका क्षेत्रात ३४ विकासकामांची भूमिपूजन वर्क आॅर्डर मिळण्याआधीच पालकमंत्र्यांनी केली. केवळ श्रेय मिळविण्याचे हे राजकारण होते. रत्नागिरी पालिकेच्या मालमत्ता विभागाने यावर आता कारवाई केली आहे. सामंत यांनी डांबरीकरणाशिवाय एकतरी काम रत्नागिरीत पूर्ण केले आहे काय? केवळ नाना-नानी पार्कसाठी निधी दिला. बाकी जो निधी पालिकेकडे आला तर नियमित रूपाने शासनाकडून मिळालेला आहे. त्यामुळे श्रेयवादाची नौटंकी सामंत यांनी आता थांबवावी, हेच योग्य ठरेल, असा टोला नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी लगावला.
पालकमंत्र्यांचे फलक पालिकेने हटविल
By admin | Updated: September 16, 2014 23:38 IST