शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

बांद्यात खासगी माहिती घेणाºयांना रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 23:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्कबांदा : जनधन योजनेचा फायदा घेतला का? घरात तुमच्या किती माणसे आहेत? आधारकार्ड, रेशनकार्ड आहे का? पॅनकार्ड आहे का? अशी खासगी माहिती विचारत घरातील लोकांची छायाचित्रे काढणाºया पाचजणांना स्थानिकांनी मज्जाव करीत धारेवर धरले. वातावरण तंग होताच बांदा पोलिसांनी वेळीच धाव घेत या पाचजणांना ताब्यात घेतले.बांद्यात शनिवार (दि. ७ ...

लोकमत न्यूज नेटवर्कबांदा : जनधन योजनेचा फायदा घेतला का? घरात तुमच्या किती माणसे आहेत? आधारकार्ड, रेशनकार्ड आहे का? पॅनकार्ड आहे का? अशी खासगी माहिती विचारत घरातील लोकांची छायाचित्रे काढणाºया पाचजणांना स्थानिकांनी मज्जाव करीत धारेवर धरले. वातावरण तंग होताच बांदा पोलिसांनी वेळीच धाव घेत या पाचजणांना ताब्यात घेतले.बांद्यात शनिवार (दि. ७ आॅक्टोबर)पासून एका खासगी कंपनीकडून घरातील लोकांचा सर्व्हे केला जात होता. रविवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास तीन युवक मोर्येवाडा परिसरात लोकांकडून माहिती घेत होते. त्यांनी काही महिलांची छायाचित्रे काढली.दरम्यान, हे तीन युवक येथील एका दुकानवजा घरात माहिती घेण्यास गेले असता तेथील युवकांनी त्यांना रोखले. तुम्ही कसली माहिती घेता? तुमच्याकडे काय पुरावा आहे? आमची माहिती घेऊन काय करणार? असे सवाल करीत या तिघांना त्यांनी धारेवर धरले. एवढ्यात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमाव जमला. लोकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना या तिघांची भंबेरी उडाली. त्यानंतर त्यांनी आपले वरिष्ठ आले असल्याचे सांगितले. त्यांनाही त्याठिकाणी बोलाविण्यात आले. त्यालाही लोकांनी चांगलेच फैलावर घेतले. दिल्ली येथील खासगी कंपनीतर्फे सर्व्हे करण्यात आल्याचे त्याने सांगताच लोक संतापले.दरम्यान, याबाबत तुम्ही स्थानिक पोलीस स्थानकात माहिती देऊन परवानगी घेतली का? असे विचारता त्यांनी होय म्हणून सांगितले. मात्र, पोलीस स्थानकात फोन लावला असता कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे लोक आणखी संतप्त झाले.वातावरण तंग होताच बांदा पोलिसांना याबाबत कळविण्यात आले. बांदा पोलीस मनीष शिंदे, विजय जाधव, जनार्दन रेवंडकर, प्रसाद कदम यांनी घटनास्थळी येत या पाचजणांना बांदा पोलीस स्थानकात आणले. याठिकाणी त्यांच्याकडून पोलिसांनी माहिती घेतली. जिल्ह्यात सर्व्हे करण्यासाठी प्रथम जिल्हाधिकारी, स्थानिक पोलीस आणि सरपंच अथवा ग्रामपंचायतीची परवानगी घ्यायची असते. मात्र, यापैकी कोणाचीही परवानगी त्यांच्याकडे नव्हती. बांदा सरपंच बाळा आकेरकर यांनीही त्यांना दुपारी तुम्ही सर्वेक्षण करू नका, असे सांगितले होते. त्यामुळे ते आणखी पेचात सापडले.