शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

रॉकेल काळा बाजाराचे ‘स्टिंग आॅपरेशन’

By admin | Updated: April 23, 2015 00:35 IST

लोकमतचा दणका

चिपळूण : तालुक्यात शिधावाटप दुकानात रॉकेल उपलब्ध नाही, असे सांगून किंवा कमी प्रमाणात रॉकेल ग्राहकाला देऊन उरलेल्या रॉकेलचा काळाबाजार होत असल्याचे वृत्त लोकमतने प्रसिध्द केले होते. या वृत्ताची बुधवारी तहसीलदार वृषाली पाटील यांनी गंभीर दखल घेतली. निवासी नायब तहसीलदार भारतभूषण रजपूत यांनी याप्रकरणी रॉकेल घेऊन जाणाऱ्या मुलीमार्फत दुकानदाराची भांडाफोड केली. सोमवारी रात्री शिवाजी चौक येथे एका टँकरमधून खुलेआम रॉकेल काढण्यात येत होते. असे प्रकार सर्रास घडत असल्याने ही बाब ‘लोकमत’ने प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. तहसीलदार वृषाली पाटील यांनी याप्रकरणी आपल्या सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी पथके पाठवली. ग्रामपंचायत निवडणूक असल्यामुळे कर्मचाऱ्यांची संख्या कमी असतानाही टँकरचा क्रमांक घेऊन त्यांनी शोधमोहीम सुरु केली. निवासी नायब तहसीलदार भारतभूषण रजपूत यांना रावतळे भागातून कविता लक्ष्मण चाळके (कार्ड क्र. ५५७) ही रॉकेल घेऊन येताना दिसली. त्यांनी सहज तिच्याकडे चौकशी केली. तिला एक लीटर रॉकेल दिल्याचे तिने सांगितले. दरवेळी आपल्याला एकच लीटर रॉकेल दिले जाते, असे तिने स्पष्ट केले. म्हणून रजपूत यांनी तिची पावती मागितली. या पावतीवर केवळ नाव लिहिलेले होते. रॉकेलचे प्रमाण लिहिलेले नव्हते. ही कोरी पावती घेऊन त्या मुलीसमवेत रजपूत यांनी रेशन दुकानदाराची भेट घेतली आणि चौकशी केली असता मागील महिन्यात या मुलीने एक लीटर रॉकेल नेले होते. परंतु, तिच्या पावतीवर ४ लीटर रॉकेल खतवण्यात आले होते. संबंधित दुकानदाराचा रॉकेलचा कोटा तपासला असता त्यामध्ये तफावत आढळली. मागणीपेक्षाही जास्त रॉकेल येथे आढळून आले.(प्रतिनिधी)संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे तहसीलदारांनी सांगितले.रॉकेल घेऊन जाणाऱ्या मुलीमार्फत केली भांडाफोड.रॉकेल उपलब्ध नाही, असे सांगून किंवा कमी प्रमाणात रॉकेल देऊन काळाबाजार होत असल्याचे वृत्त लोकमतने प्रसिध्द केले.ज्या मुलीने १ लीटर रॉकेल नेले, तिच्या पावतीवर चार लीटर रॉकेल नेल्याची नोंद.रॉकेल पुरवठा करणारा टँकर मालक हा शहरातील एका पेट्रोल पंपाचा मालक आहे. रावतळे येथील घटनेनंतर त्याने हे प्रकरण वाढू नयते, यासाठी प्रयत्न सुरु केले होते. परंतु, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी टँकर मालकाला ताकासतुर लागू दिली नाही. त्यामुळे तोही हतबल झाला होता. सर्वच दुकानांची झाडाझडती घेवून सामान्य जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे.