शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

बांद्याचा गड भाजपने राखला, अक्रम खान विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 13:10 IST

बांदा सरपंच मंदार कल्याणकर यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक झाली. यात अपेक्षेप्रमाणे भाजपने बाजी मारली असून, आपला गड कायम राखण्यात यश मिळविले आहे.

ठळक मुद्दे बांद्याचा गड भाजपने राखला, अक्रम खान विजयी शिवसेनेच्या मकरंद तोरस्कर यांचा ८१३ मतांनी पराभव

सावंतवाडी : बांदा सरपंच मंदार कल्याणकर यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक झाली. यात अपेक्षेप्रमाणे भाजपने बाजी मारली असून, आपला गड कायम राखण्यात यश मिळविले आहे. या चुरशीच्या निवडणुकीत भाजपच्या अक्रम खान यांनी शिवसेनेच्या मंकरद तोरस्कर यांचा तब्बल ८१३ मतांनी पराभव करत आपले वर्चस्व राखले आहे. यात अक्रम खान यांना २,१६१ मकरंद तोरस्कर १,३४८ तर अपक्ष साईप्रसाद कल्याणकर यांना ११५ मते पडली आहेत.बांदा सरपंच मंदार कल्याणकर यांनी आपल्या व्यक्तीगत कारणासाठी दोन महिन्यांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर बांदा ग्रामपंचायतीची सरपंचपदाची पोटनिवडणूक लागणार हे निश्चित झाले होते. या निवडणुकीसाठी सुरुवातीपासूनच विद्यमान उपसरपंच अक्रम खान इच्छुक होते. भाजपनेही त्यांनाच उमेदवारी दिली होती. तर शिवसेनेकडून ग्रामपंचायत सदस्य मकरंद तोरस्कर यांनी निवडणूक लढविली होती. अपक्ष म्हणून साईप्रसाद कल्याणकर यांनीही नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला होता.सावंतवाडीतही विजयश्री खेचून आणणार : सारंगआम्ही बांद्याप्रमाणे सावंतवाडीतही विजय खेचून आणणार असल्याचे तालुकाध्यक्ष महेश सारंग यांनी सांगितले. हा स्थानिक ग्रामस्थ तसेच पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा विजय आहे. कार्यकर्त्यांनी जोरदार मेहनत घेऊन काम केले. गेला महिनाभर घरोघरी जाऊन प्रचार केला. हा त्यांचा विजय आहे, असे मत सारंग यांनी व्यक्त केले. तसेच भाजपने मुस्लिम चेहरा देऊन एक आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे त्याचा निश्चित असा फायदा आम्हाला जिल्ह्यात होईल. बांदा येथे विजयश्री खेचून आणली. आता हा विजयाचा रथ संपूर्ण राज्यात जाईल, असेही यावेळी सारंग यांनी सांगितले. तसेच त्यांनी अक्रम खान यांचे अभिनंदन केले.सर्वांना बरोबर घेऊन काम करणार : अक्रम खानबांद्यातील नागरिकांनी जो कौल दिला तो मान्य असून, आता माझी जबाबदारी अधिक वाढली आहे. त्यामुळे चांगल्या पध्दतीने काम करून बांदा शहरात विकासाची गंगा घेऊन यायची आहे. यासाठी सर्वांना बरोबर घेऊन काम करणार असल्याचे विजयी उमेदवार अक्रम खान यांनी सांगितले. 

टॅग्स :sarpanchसरपंचsindhudurgसिंधुदुर्ग