शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
3
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी सर्वात कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
5
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
8
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
9
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
10
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
11
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर
12
"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट
13
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
14
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
15
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
16
Pahalgam Attack Update : वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या
17
यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
18
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

भाजप येत्या सोमवारी 'या'साठी धरणे आंदोलन छेडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2021 19:13 IST

कणकवली: सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनधिकृत दारु विक्री, वाळू व्यवसायाजसह अवैध धंद्यांना मोठ्या प्रमाणात प्रशासनाकडून पाठीशी घातले जात आहे. पालकमंत्र्यांच्या वरदहस्ताने ...

कणकवली: सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनधिकृत दारु विक्री, वाळू व्यवसायाजसह अवैध धंद्यांना मोठ्या प्रमाणात प्रशासनाकडून पाठीशी घातले जात आहे. पालकमंत्र्यांच्या वरदहस्ताने हे अवैध धंदे सिंधुदुर्गात सुरु आहेत. प्रशासनाचा कोणालाच धाक राहिलेला नाही.

त्याचबरोबर त्रिपुरा येथील न घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यात दंगली झाल्या आहेत. त्यात विनाकारण भाजपच्या कार्यकर्त्यांना  पोलिसांमार्फत सत्ताधारी अडकवत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्याबरोबरच अटकेचा निषेध व्यक्त करण्यासाठी येत्या सोमवारी, २२ नोव्हेंबरला जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालसमोर भाजपच्यावतीने धरणे आंदोलन छेडण्यात येणार आहे. अशी माहिती भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिली. कणकवली येथील भाजपा कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  

राजन तेली म्हणाले, त्रिपुरा घटनेच्यानंतर महाराष्ट्रात मालेगाव,नांदेड, अमरावती येथे दंगली घडल्या आहेत. दुकाने जाळली गेली आहेत. मात्र, कुठल्याही प्रकारची घटना घडली नसताना दंगली झाल्या आहेत. शासन सगळ्या गोष्टी बघत राहिले. दुकाने,गाड्या, कार्यालये  फोडण्यासाठी रस्त्यावर लोक आले. पोलीस गप्प का राहिले? आता पोलिसांनी फक्त अमरावती मध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांना वेठीस धरले आहे. भाजपला टार्गेट करण्याचे काम सत्ताधारी व पोलीस करत असल्याचा आरोप राजन तेली यांनी यावेळी केला.ते म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली नाही. दंगली घडवणाऱ्या लोकांना सोडले जात आहे. मग पोलिसांचे गुप्तहेर खाते काय करत आहे? भाजप कार्यकर्त्यांना विनाकारण होत असलेल्या  अटकेच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्यावतीने राज्यात ४०० तहसीलदार कार्यालयात धरणे आंदोलन करण्याबरोबरच मुख्यमंत्र्यांना पाठविण्यासाठी  निवेदन सुपूर्द केले जाणार आहे.त्रिपुरा येथे न घडलेल्या घटनेची चौकशी निवृत्त न्यायाधीशामार्फत करावी. दंगल घडवणाऱ्या लोकांवर कारवाई करावी .रजा अकादमीवर बंदी घाला. सामान्य लोकांवर जे गुन्हे दाखल केले ते मागे घ्या,पूर्व ग्रह दुषितपणातून  भाजपच्या कार्यकर्त्यांवर कारवाई केली आहे ती थांबविण्यात यावी. अशा  मागणीचे निवेदन दिले जाणार आहे,असेही राजन तेली यांनी यावेळी सांगितले.       त्याचबरोबर, एसटी कर्मचारी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ज्या कामगारांचे निलंबन केले आहे ते तात्काळ मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.प्रशासनाच्या आशीर्वादानेच वाळू विक्री !सिंधुदुर्गात राजरोस अनधिकृतरित्या वाळू विकली जात आहे. तीन वर्षे वाळू लिलाव झाले नाहीत. तरीही वाळू मिळत आहे. सत्ताधारी पालकमंत्री व आमदार दरवेळी मुंबईत बैठक लावतात. पण लिलावाच्या दराबाबत निर्णय झाला नाही. प्रशासनाच्या आशीर्वादाने वाळू  बाजारात विकली जात आहे. त्यामागे कोण आहेत हे आता जनतेला दिसून येत असल्याचे तेली म्हणाले.अवैध दारू वाहतुकीवर वचक नाही !दारु किंवा वाळूची कधीतरी एक गाडी पकडली जाते. त्यामुळे त्यांना वचक बसत नाही. अवैध धंदे बंद होणार की नाही?प्रशासन नावाची यंत्रणा जिल्ह्यात राहिलेली नाही. याबाबत सविस्तर माहिती जिल्हाधिकारी यांना देऊनही कारवाई झालेली नाही. मात्र, शेतकऱ्यांने बैलगाडी तुन वाळू आणल्यास कारवाई होते. त्यामुळे भाजपच्या पुढील जिल्हा कार्यकारिणीत जिल्हा प्रशासनाविरोधात आंदोलन करण्याचे धोरण निश्चित केले जाईल,असा इशारा राजन तेली यांनी यावेळी दिला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRajan Teliराजन तेली