शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

आंबोलीतील जैवविविधतेला वृक्षतोडीचे ग्रहण

By admin | Updated: May 15, 2016 00:03 IST

परिसर बनतोय उजाड : वनविभागाचे कारवाईकडे दुर्लक्ष, निसर्गप्रेमींचा न्यायालयात जाण्याचा इशारा

आंबोली : आंबोलीसह आंबोलीच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये प्रचंड प्रमाणात अवैध वृक्षतोड सुरू असून, वणवेही मोठ्या प्रमाणावर लावले जात आहेत. सह्याद्रीच्या पट्ट्यातील जैवविविधतेचे महत्त्व पाहता हा प्रकार भयंकर व चिंताजनक आहे. या प्रकाराने निसर्गप्रेमींकडून संताप व्यक्त होत असून वनविभाग मात्र यावर कोणतीही कारवाई करत नसल्याचे चित्र आहे. वनविभागाच्या या बोटचेप्या धोरणामुळे आंबोली परिसरातील वृक्षसंपदा नामशेष होण्याचा धोका संभवतो आहे. देशाच्या पर्यटनातील मानबिंदू म्हणून आंबोलीची ओळख आहे. वर्षा पर्यटनात ओसंडून वाहणारा धबधबा, डोंगररांगातून येणारे पावसाचे तुषार आणि गार हवा यामुळे पर्यटकांच्या लोकप्रियतेच्या शिखरावर आंबोली हे गाव पोहचले आहे. चारही बाजूंनी वेढलेल्या झाडांनीही या पर्यटन स्थळाला चांगलाच बहर आला आहे. शिवाय यामध्ये निरनिराळे पक्षी, प्राणी, फुलपाखरे आणि विविध वन्यजीव आढळतात. तसेच या डोंगररांगामध्ये आढळणारी औषधी वनस्पती म्हणजे तर आयुर्वेदाची संपत्तीच मानली जाते. पण या संपत्तीचा दिवसेंदिवस विविध प्रकारांनी ऱ्हास केला जात आहे. यातील प्रमुख कारण म्हणजे येथे होणारी बेकायदेशीर वृक्षतोड होय. सावंतवाडीच्या वनसंज्ञेत व महाराष्ट्र शासनाच्या जमिनीत अवैध वृक्षतोडीचे प्रमाण वाढले असून, घाटउतार तसेच घाटाखालच्या गावांमधील वनसंज्ञेत व महाराष्ट्र शासनाच्या जमिनीत प्रचंड मोठ्या प्रमाणार अनधिकृतरित्या वृक्षतोड होत आहे. घाटात उभे राहिल्यानंतर उघड्या डोळ्यांनी हे दृश्य दिसत असून, या बेसुमार अवैध तोडीमागे कोण कारणीभूत आहे, हे शोधणे गरजेचे आहे. याबाबत जे सर्वसामान्यांना दिसते ते वनकर्मचाऱ्यांना माहीत नाही, असे समजणे चुकीचे ठरेल. शिवाय या तोडीला वाहतूक परवाने कोण देत आहे, याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. संपूर्ण सावंतवाडीच्या वनसंज्ञेत व महाराष्ट्र शासनाच्या जमिनीत अवैध वृक्षतोडीचे प्रमाण वाढले असून, वनविभाग मात्र काहीही करत नसल्याचे चित्र आहे.शिवाय या जंगलसंपत्तीत लावले जाणारे वणवेही तितकेच कारणीभुत आहेत. सध्या आंबोली परिसरात या वणव्यांची वाढती संख्या चिंता वाढवणारी ठरत आहे. हे वणवे काही ठिकाणी मुद्दाम लावले जात आहेत तर काही ठिकाणी शिकारीसाठीही लावले जात आहेत. काही वणवे नैसर्गिक रित्या लागले जाऊन वनसंपत्तीची हानी होत आहे. बहुतांशी ठिकाणचे वणवे हे नैसर्गिक नसून लोकांकडून लावले जात असल्याचे निदर्शनास येत आहेत. वारंवार होणारी बेकायदा वृक्षतोड आणि वणवे यामुळे सह्याद्रीच्या पट्ट्यातील जैवविविधतेचा ऱ्हास होण्याचा धोका संभवतो आहे. या वनसंपत्तीचे महत्त्व पाहता हा प्रकार भयंकर व चिंताजनक असतानाही वनविभाग मात्र अजूनही तितकासा गंभीर दिसत नाही. परिणामी वन्य संपत्तीच्या रक्षणाचे वाली कोण, असा सवाल निसर्ग प्रेमींतून व्यक्त होत आहे. हा प्रकार असाच सुरू राहिल्यास निसर्गप्रेमींना न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा इशारा दिला आहे. (वार्ताहर)वनमंत्री, वनसंरक्षक उपवनसंरक्षकांना निवेदनदिवसेंदिवस होत असलेली बेकायदा वृक्षतोड व वणव्यांनी होत असलेल्या वनसंपत्तीचा ऱ्हास याची माहिती असूनही याविरोधात काहीच कारवाई होत नसल्याने निसर्गप्रेमी व वन्यजीव अभ्यासकांनी वनमंत्री, मुख्य वनसंरक्षक कोल्हापूर, उपवनसरंक्षक यांना चौकशी व कारवाईचे निवेदन दिले आहे. दिवसेंदिवस होत असलेला वन्यसंपत्तीचा ऱ्हास भविष्यातील मानवी आरोग्याला धोका असून याची कोणीही दखल घेत नाही. त्यामुळे सर्व निसर्गप्रेमी न्यायालयाचे दरवाजे ठोठावतील, असा इशारा दिला आहे. निवेदनाची प्रत वनमंत्री व मुख्य वनसंरक्षक कोल्हापूर यांना दिली आहे. याप्रकरणी संबंधित कोणती कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.