शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

...तर मोठा राजकीय भूकंप घडवेन : राणे

By admin | Updated: March 20, 2017 23:09 IST

...तर मोठा राजकीय भूकंप घडवेन : राणे

कुडाळ : आपण कोणालाही व आपल्याला कोणीही भेटलेले नाही. मला इतर पक्षांत जाण्यात रस नाही. माझ्यासारखा माणूस असले गुपित लपवून ठेवणार नाही. एखादा निर्णय घ्यायचा असल्यास सर्वांना सोबत घेण्यात येईल. तसेच माझा निर्णय तुम्हा सर्वांना पहिला सांगितला जाईल. पक्ष बदलण्याबाबतचा तसा निर्णय घेण्याची वेळ आल्यास मी छोटेमोठे फटाके फोडणार नाही तर मोठा भूकंपच घडवून आणेन, अशी स्पष्टोक्ती राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस नेते आमदार नारायण राणे यांनी केली.नारायण राणे हे स्वगृही परतणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व काही वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध होत आहेत. या पार्श्वभूमीवर नारायण राणे बोलत होते. त्यांनी पक्ष प्रवेशाबाबतच्या सर्व शंका-कुशंकांचा स्पष्ट शब्दांत इन्कार केला. आपले निर्णय हे सर्वसमावेशक असतात आणि आपली भूमिका स्पष्ट असते, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.कुडाळ येथील हॉटेल कोकोनटमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी आमदार नीतेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, रणजित देसाई, विकास कुडाळकर, गुरूनाथ पेडणेकर, अंकुश जाधव, कुडाळ नगराध्यक्ष विनायक राणे, संदीप कुडतरकर, आदी उपस्थित होते. राज्याचा अर्थसंकल्प हा जनतेच्या हिताचा नसून खोटारडा व दिशाभूल करणारा आहे. मागील अर्थसंकल्पातील केवळ २४ हजार कोटी रुपयेच खर्च करणारे भाजप सरकार यावर्षी ७७ हजार कोटी रुपये काय खर्च करणार? असा सवाल करत भाजपा सरकार केवळ मोठा आकडा दाखवून जनतेची दिशाभूल करण्यात माहीर असल्याचे या अर्थसंकल्पातून सिद्ध करत आहे, अशी टीका केली. (प्रतिनिधी)बळी गेल्यानंतर संशोधन केंद्र उभारणार काय ?जिल्ह्यात माकडतापाच्या पार्श्वभूमीवर संशोधन केंद्र्र उभारण्यात येणार आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे, असे सांगण्यात आले. पण हे संशोधन केंद्र लोकांचा नाहक बळी गेल्यावर उभारणार काय, असा सवाल करून आपण मंत्री असताना खेकडा प्रकल्प व तिलारीचे पाणी किनारपट्टीला पाईप लाईनव्दारे देण्याचे काम सुरू झाले होते. मात्र, पालकमंत्री दीपक केसरकर या अर्थसंकल्पात हे प्रकल्प दाखवून श्रेय लाटत आहेत, असा आरोप त्यांनी केला.