शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

ओसरगाव येथील टोलनाका सुरू करण्यामागे मोठे आर्थिक गणित, संदेश पारकरांचा गंभीर आरोप

By सुधीर राणे | Updated: June 1, 2023 11:57 IST

सिंधुदुर्गवासीयांना टोलमाफी मिळावी यासाठी तीव्र संघर्ष करणार

कणकवली: मुंबई-गोवा महामार्गावर ओसरगाव येथील टोल नाका लवकरच सुरू होणार असल्याची चर्चा आहे. मात्र, सिंधुदुर्गवासीयांना टोलमाफी मिळाली पाहिजे ही शिवसेनेची भूमिका आहे. एम.एच.०७ च्या गाड्यांना टोलमाफी द्या किंवा ओसरगाव येथील टोलनाका जिल्ह्याबाहेर हलवा अशी जनतेची मागणी असून त्यासाठी प्रसंगी आम्ही रस्त्यावर उतरून संघर्ष करु. असे सांगतानाच  हा  टोल नाका सुरू करण्यामागे मोठे आर्थिक गणित आहे. असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी केला आहे.कणकवली येथील विजयभवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पारकर म्हणाले, ओसरगाव येथे १ जूनपासून टोलवसुली सुरू करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. टोल वसुलीचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराने ७ ते ७.५ लाख रुपये सरकारला प्रत्येक दिवशी भरायचे असून दिवसाची वसूली ११ ते ११.५० लाख होणार असल्याचा अंदाज आहे. जे सध्या सत्तेत आहेत, त्यांना दीड लाख द्यायचे व ठेकेदाराला ३ लाख मिळतील असे हे टोल वसुलीमागे आर्थिक गणित आहे.     आतापर्यंत जिल्ह्यातील ८० टक्के काम पूर्ण झालेले आहे. यासाठी जिल्हावासीयांनी सहकार्य केले. पण अनेकांना अजून जमिनीचा व त्यांच्या मालमत्तेचा मोबदला मिळालेला नाही. कणकवलीमध्ये आरओडब्ल्यू लाईन नुसार काम झालेले नाही. ड्रेनेज सिस्टीम अपूर्ण आहे. पुलावरून धबधब्याप्रमाणे पाणी कोसळते, सर्व्हिस रोड अरुंद आहेत. यासमस्यांबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. मात्र, तरीही टोल वसूलीसाठी प्रयत्न केला जात आहे. खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्त्वाखाली आम्ही टोलवसुलीला विरोध करत आहोत. एमएच ०७ च्या गाडयांना माफी मिळायला हवी, ही आमची मागणी आहे.

ओसरगांव टोलमुळे जिल्हयाचे विभाजन होत आहे. न्यायालय, प्रशासकीय कार्यालये,  जिल्हा परिषद, जिल्हा रुग्णालय ,वैद्यकीय महाविद्यालय आदीसाठी चार तालुक्यांतील लोकांना टोलचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे.  टोलमुक्त सिंधुदुर्ग समितीच्या माध्यमातूनही जिल्हावासीयांचा यासाठी प्रयत्न सुरू आहे. या लढ्यासाठी जिल्ह्यातील जनतेचेही सहकार्य हवे आहे. जनतेने टोल भरण्यास विरोध केला तरच हे आंदोलन यशस्वी होणार आहे, असेही संदेश पारकर म्हणाले.टोलबाबत सर्वपक्षीयांनी एकत्रित येत जिल्हाधिकारी पातळीवर बैठक होऊन निर्णय घेण्याची गरज होती. मात्र, सर्वजण गप्प आहेत. शिवसेनेच्या माध्यमातून आमचा लढा सुरू असणार आहे. याच प्रश्नांच्या अनुषंगाने आपण बांधकामंत्री रविंद्र चव्हाण यांची भेट घेतली व त्यांचे या प्रश्नांकडे लक्षही वेधल्याचे संदेश पारकर यांनी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गtollplazaटोलनाका