शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

भुईबावडा घाटात मार्ग सुरळीत : पडझड सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 11:59 IST

भुईबावडा घाटात दरडीची दोन ठिकाणी किरकोळ पडझड झाली. परंतु, त्याचा वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही. दरम्यान, कोसळलेल्या दरडीच्या ढिगाऱ्याचा उर्वरित भाग हटविण्याची मोहीम सकाळपासून पुन्हा सुरू करण्यात आली होती. मात्र, खारेपाटण-गगनबावडा मार्गावरील वाहतूक सुरळीत चालू आहे.

ठळक मुद्देभुईबावडा घाटात मार्ग सुरळीत : पडझड सुरूचदरडी काढण्याची बांधकाम विभागाकडून दिवसभर मोहीम

वैभववाडी : भुईबावडा घाटात दरडीची दोन ठिकाणी किरकोळ पडझड झाली. परंतु, त्याचा वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही. दरम्यान, कोसळलेल्या दरडीच्या ढिगाऱ्याचा उर्वरित भाग हटविण्याची मोहीम सकाळपासून पुन्हा सुरू करण्यात आली होती. मात्र, खारेपाटण-गगनबावडा मार्गावरील वाहतूक सुरळीत चालू आहे.तालुक्यातील पावसाचा जोर पूर्णत: ओसरला आहे. परंतु, तीन-चार दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे भुईबावडा घाटात दोन ठिकाणी किरकोळ प्रमाणात दरड कोसळली. मात्र, दरडीची माती रस्त्यावर आली नसल्याने तिचा वाहतुकीला अडथळा झालेला नाही. रात्री कोसळलेल्या दरडीचा रस्त्यावरील ढिगारा हटवून मार्ग खुला केला होता.

मात्र, गटारातील ढिगारा शिल्लक होता. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने सकाळपासून दोन जेसीबींच्या सहाय्याने भुईबावडा घाटात कोसळलेल्या दरडी काढण्याची मोहीम हाती घेतली होती. दिवसभर हे काम सुरू होते. परंतु, त्याचा घाटातील वाहतुकीवर परिणाम झालेला नाही. दरम्यान, दिवसभर पावसाने उसंत घेतल्याने दरड हटविण्याचे काम वेगाने करण्यात आले.पाऊस ओसरल्याने लावणीपूर्व मशागत सुरूपावसाचा जोर ओसरल्याने शेतीच्या कामांना वेग आला आहे. पाऊस कमी झाला असला तरी पाणथळ शेतात मुबलक पाणी असल्याने भातलावणीला सुरुवात झाली आहे. तर उथळ भागातील शेतमळ्यांमध्ये लावणीपूर्व मशागत सुरू आहे. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाsindhudurgसिंधुदुर्ग