शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
3
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष सुटल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले...
4
बाईकचा चेसिस नंबर सापडलाच नाही! प्रज्ञा सिंह ठाकूर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून कशा सुटल्या?
5
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावे लागणार; पाहा नवे दर
6
मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी 
7
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण निकाल: सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता, कुणावर होते काय आरोप?
8
Upcoming Smartphones: विवो, रेडमीपासून ते गूगल पिक्सेलपर्यंत; ऑगस्टमध्ये पडणार स्मार्टफोनचा पाऊस!
9
पाकिस्तानी बॉर्डरजवळ विखुरलेल्या बांगड्यांचं सत्य काय?; भारताने शोधून काढलं दडलेलं रहस्य
10
मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निर्णयावर ओवेसी नाराज, मोदी सरकारवर केले गंभीर आरोप...
11
शिक्षण महागलं! "ABCD शिकवण्याचे २.५ लाख द्यायचे?"; लेकीची नर्सरीची फी पाहून आई शॉक
12
सावधान! AI मुळे 'या' नोकऱ्या धोक्यात? मायक्रोसॉफ्टच्या अभ्यासात धक्कादायक खुलासा, तुमची नोकरी सुरक्षित आहे का?
13
ट्रम्प यांचा भारतावरील टॅरिफ बॉम्ब अमेरिकन लोकांवरच उलटणार? औषधांच्या किंमती वाढण्याचा धोका
14
"राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल
15
"हिंदू दहशतवादी नाही, शाहांचं विधान अन् आज कोर्टात आरोपींची निर्दोष सुटका हा फक्त योगायोग"
16
१७ वर्षांनी आरोपी निर्दोष सुटले, मग दोषी कुठे आहेत?; मालेगाव स्फोट खटल्याच्या निकालानंतर प्रश्नचिन्ह
17
धक्कादायक! ८ वर्षांच्या चिमुकल्याच्या गुप्तांगावर शिक्षिकेनं फवारलं कॉलीन; नालासोपाऱ्याच्या शाळेला टाळं
18
लॉर्ड्स मैदानावर खेळला शाहिद कपूर, इंग्लंडच्या माजी खेळाडूंसोबत शेअर केले Photo
19
Malegaon Blast Case Verdict : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटताच प्रज्ञा सिंह भावूक, अश्रू अनावर, म्हणाल्या - 'भगवा जिंकला...'
20
मालेगाव बॉम्बस्फोट; कधी अन् कसा झाला? किती लोक मृत्यूमुखी पडले? जाणून घ्या पूर्ण टाईमलाईन

जनतेची फसवणूक करणाऱ्यापासून आतातरी सावध व्हा, प्रविण भोसले यांचे मतदारांना आवाहन

By अनंत खं.जाधव | Updated: July 30, 2024 15:45 IST

आजगाव मायनिंग प्रकल्पाला विरोधच

सावंतवाडी : शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी गेल्या पंधरा वर्षात जनतेची दिशाभूल आणि फसवणूक केली आहे. त्यामुळेच त्यांना संधी असून ही एक प्रकल्प आणता आला नाही. किंवा लोककल्याणासाठी काही करता आले नाही. त्यामुळे अशा फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला निवडून द्यावे का याचा विचार मतदारांनी करावा असे आवाहन माजी मंत्री प्रविण भोसले यांनी केले.आजगाव येथील मायनिंग प्रकल्पाचा पुनर्विचार करण्यात यावा मुठभर रोजगारासाठी वीस गावे देशोधडीला लावणार आहात का? असा सवाल ही त्यांनी यावेळी केला. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी विविध प्रश्नांवर आपली भुमिका स्पष्ट केली.भोसले म्हणाले, सावंतवाडी मतदारसंघात तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या मंत्रीमंडळात मी मंत्री म्हणून काम करत असतना अनेक प्रकल्प आणले आणि ते पूर्ण ही केले. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय असो किंवा आयटीआय फलोत्पादन योजना अशा कामाची नावे आजही घेतली जातात. पण केसरकर यांनी मागील पंधरा वर्षात काय केले याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे. फक्त जनतेची फसवणूक करण्याशिवाय ते काही करू शकले नाहीत. त्यामुळेच आज त्यांना गावात बंदी करण्यात आली असल्याचे दिसून येत आहे. आत्तापर्यंत असे कोणा विरोधात घडले नव्हते ते घडले आहे. याचा केसरकर यांनी विचार करावा असा सल्लाही भोसले यांनी दिला.जनतेची पदासाठी दिशाभूल करायची आणि या पक्षातून त्या पक्षात अन्यायाच्या नावाखाली जायचे. माझे याच्या बरोबर चांगले त्याच्या बरोबर चांगले म्हणायचे पण काय करायचे नाही. निवडणुका आल्या की बाजा पेटी आणि टबले द्याचे आणि त्यावर मते मागायची आता याचा जनतेने विचार केला पाहिजे नाहीतर हे जनतेस गृहीत धरून पुढे काहीच करणार नाहीत. आता कुठेतरी थांबवा आणि महाविकास आघाडीला संधी द्या असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.सावंतवाडी बसस्थानक साधे करता आले नाही ते मंत्री पदावर कसे बसू शकतात.  पंचायत समिती इमारत फक्त केसरकर यांच्यामुळेच प्रलंबित राहिली. पंचतारांकित हॉटेल निर्माण करण्याचा पुढाकार तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी घेतला पण आतापर्यंत पुढे काही झाले नाही आणि आता निवडणूक आली असल्याने भुमिपूजन करण्याची स्वप्ने बघत आहेत अशी टीकाही भोसले यांनी केली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गPraveen Bhosaleप्रवीण भोसले Deepak Kesarkarदीपक केसरकर