शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
5
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
7
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
8
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
9
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
10
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
11
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
12
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
13
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
14
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
15
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
16
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
17
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
18
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
19
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
20
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”

युतीला सत्तेसह तरुण उमेदवारांचा फायदा

By admin | Updated: November 4, 2015 23:59 IST

दोडामार्ग नगरपंचायत : काँग्रेसला ज्येष्ठतेसह अति आत्मविश्वास नडला

वैभव साळकर-- दोडामार्ग--कसई-दोडामार्ग नगरपंचायत निवडणुकीत सेना-भाजपची सरशी झाली. त्यात काँगे्रस-राष्ट्रवादीला पराभवास सामोरे जावे लागले. याठिकाणी केंद्रात आणि राज्यात युतीचे राज्य असल्याचा फायदा सेना-भाजप युतीला नगरपंचायत निवडणुकीत झाला. शिवाय युतीने दिलेल्या तरुण-तडफदार उमेदवारांकडेच मतदारांचा जास्त कल असल्याचे दिसून आले. याउलट काँग्रेसने दिलेल्या उमेदवारांना मतदारांनी नाकारत युवा लोकांनाच संधी दिली पाहिजे, हा संदेश दिलाच; त्याचबरोबर काँग्रेसला असणारा अतिआत्मविश्वासही नडला आहे. एकंदरीत ही निवडणूक काँग्रेस-राष्ट्रवादीला आत्मपरीक्षण करायला लावणारी ठरली.कसई-दोडामार्ग नगरपंचायतीची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची झाली होती. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि सेना-भाजपसाठी ही निवडणूक आपल्या अस्तित्वासाठी ंिजंकणे गरजेचेच बनले होते. खास करून युतीची केंद्र आणि राज्यात सत्ता असल्याने कसई-दोडामार्ग नगरपंचायतीचा गड आपल्याकडे ठेवण्याचे आव्हान त्यांच्यासमोर होते. तर राज्यासह जिल्ह्यात बहुमताच्या सत्तेची उणीव भरून काढण्यासाठी काँग्रेसला ही निवडणूक जिंकणे महत्त्वाचे होते.त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. दोन्ही गटांकडून नवखे उमेदवार निवडणूक रिंंगणात उतरविण्यात आले होते. मात्र, सेना-भाजप युतीचे उमेदवार आघाडीच्या उमेदवारांपेक्षा तरुण होते. युवावर्गाला याठिकाणी जास्त प्राधान्य देण्यात आले आणि युवा उमेदवारांकडेच मतदारांचा कल राहिला. प्रभाग क्र. १७ आणि ३ मधील अपक्ष उमेदवारांना केवळ पाच मतांच्या फरकाने पराभवास सामोरे जावे लागले. यावरून पक्षाचे लेबल असले, तरी ज्याचा जनसंपर्क दांडगा, त्याच्याकडेच मतदारांचा कौल हे यानिमित्ताने प्रकर्षाने दिसून आले. प्रभाग क्र. १ मध्ये मनसेचे रामचंद्र ठाकूर यांना मतदारांनी कौल देऊन मनसेचे खाते खोलले. ठाकूर यांनी निसटता विजय मिळविला असला, तरी त्यांनी आपल्या प्रभागात लोकांच्या केलेल्या कामाची त्यांना पोचपावती मिळाल्याचे राजकीय जाणकार बोलत होते. प्रभाग २ मध्ये वैष्णवी रेडकर या भाजपच्या उमेदवार विजयी झाल्या. याठिकाणी प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या तुलनेत त्या तरुण होत्या. येथे मतदारांनी तरुण उमेदवारालाच प्राधान्य दिले. प्रभाग क्र. ३ हा अपक्ष उमेदवाराला मिळालेल्या ३५ मतांमुळे आठवणीत राहील. याठिकाणी रेशमी फुलारी यांना ३५ मते मिळाली, तर त्यांच्या विरोधात उभ्या असलेल्या सेनेच्या उमेदवारास २६, तर विजयी झालेल्या काँग्रेसच्या उमेदवारास ४० मते मिळाली. याठिकाणी आपल्या प्रभागात उमेदवाराचा जनसंपर्क किती दांडगा असावा, हे अपक्ष उमेदवाराला पक्षीय लेबल असलेल्या उमेदवारांच्या तुलनेत मिळालेल्या मतावरून दिसून येते. युवा उमेदवारांवर जास्त विश्वासएकंदरीत या निवडणुकीत युवा उमेदवारांवरच मतदारांनी जास्त विश्वास टाकल्याचे दिसून आले. याउलट काँग्रेस-राष्ट्रवादीला मतदारांनी साफ नाकारले.प्रचारात झालेला ढिलाईपणा आणि अतिआत्मविश्वास काँग्रेस-राष्ट्रवादीला या निवडणुकीत नडला आणि पराभवाला सामोरे जावे लागले. शिवाय राज्यस्तरीय नेत्यांनीही प्रचाराकडे पाठ फिरवल्याने त्याचा परिणाम निवडणूक निकालावर झाला. मनसेने चार जागांपैकी एक जागा जिंकत दोन्ही आघाड्यांत खळबळ माजवून सोडली. काहीही नसताना एका नगरसेवकाची मारलेली बाजी हा दोडामार्गच्या राजकारणातील चंचू प्रवेश मानण्यात येत असला तरी जिल्ह्याच्या राजकारणात मनसेचे अढळ स्थान निश्चित झाले, हे नाकारता न येणारे सत्य दोन्ही आघाड्यांना मान्य करावेच लागेल.