शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
3
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
4
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
5
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
6
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
7
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
8
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
9
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
10
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
11
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
12
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
13
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
14
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
15
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
16
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
17
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
18
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
19
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!
20
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   

विकासासाठी एकसंध व्हावे

By admin | Updated: May 27, 2016 22:19 IST

नारायण राणे : कुडाळ नदीपात्राची पाहणी; पाणी पुरवठा सुरुळीत होणार

कुडाळ : कुडाळ भंगसाळ नदी पात्रात गाळ उपसा उपक्रम येथील सामाजिक संघटनांनी सर्वांच्या सहकार्याने एकत्र येत चांगल्या प्रकारे राबविला आहे. अशाच प्रकारे विकासाला चालना देण्यासाठी सर्वांनी एकत्र या, असे आवाहन माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी भंगसाळ नदीतील गाळ काढण्याऱ्या सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचे विशेष अभिनंदन करताना केले. यावेळी राणे यांनी भंगसाळ नदीपात्रात गाळ उपसा उपक्रमाची पाहणी केली. कुडाळ भंगसाळ नदीतील गाळ गेली अनेक वर्षे न काढल्यामुळे येथील नदीच्या पात्रात गाळाचे छोटे मोठे डोंगर तयार झाले आहेत. यामुळे येथील नदीतील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात प्रत्येकवर्षी घटत आहे. येथील नदी पात्रातील गाळ काढून नदीतील पाण्याची पातळी वाढेल. कुडाळ शहराबरोबरच अन्य आजूबाजूच्या गावांना मुबलक पाणी पुरवठा होईल. नदीही स्वच्छ होईल. या उद्देश्याने कुडाळ येथील सामाजिक संघटना एकत्र येत येथील नदी पात्रातील गाळ महाराष्ट्र शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेतून काढण्यासाठी पुढाकार घेतला असुन गेल्या अनेक दिवसापासून हा गाळ काढण्याचे काम सुरू आहे.दरम्यान, गेल्या दोन दिवसापासून सदरचा हा गाळ उपसा उपक्रम एमआयडीसी जॅकवेलच्या ठिकाणच्या भंगसाळ नदी पात्रात सुरू आहे. या ठिकाणी नारायण राणे यांनी गुरूवारी सांयकाळी भेट देत पाहणी केली. तसेच हा उपक्रम राबविणाऱ्या सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. ही अभिनव संकल्पना प्रत्यक्षात साकारणारे माजी जि. प. उपाध्यक्ष रणजित देसाई यांचा तसेच या उपक्रमाला सहकार्य करणाऱ्या पत्रकार समितीतर्फे समितीचे सचिव विलास कुडाळकर यांचाही विशेष सत्कार राणे यांनी केला. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, सतीश सावंत, रणजित देसाई, विकास कुडाळकर, अमित सामंत, नगराध्यक्ष विनायक राणे, उप नगराध्यक्ष आबा धडाम, रूपेश पावसकर, सुनील बांदेकर, गजानन कांदळगावकर, , डॉ. संजय केसरे, डॉ. संजय सावंत, दिनेश साळगांवकर, राजन बोभाटे, कमलेश पाटकर, प्रणय तेली, अमोल सामंत, अनिल कुडपकर, नितीन कुडाळकर तसेच इतर काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.