शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सव कालावधीत वीज जोडणी तोडल्यास खबरदार!, शिवसेना शिंदे गटाने दिला इशारा

By सुधीर राणे | Updated: August 26, 2022 16:17 IST

गणेशोत्सव काळात वीजग्राहकांना वीजबिलवसुलीचा तगादा लावू नये

कणकवली : ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर विजवितरणचे कर्मचारी ग्राहकांच्या दारात विज बिल वसुलीला जात आहेत. तसेच वीज जोडणी तोडत आहेत. जर यापुढे गणेशोत्सवाच्या काळात कोणाचीही वीज तोडली तर गप्प बसणार नाही. आम्हाला कायदा हातात घ्यायला लावू नका. अशा शब्दात शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी विजवितरण कार्यालयावर शुक्रवारी धडक देत अधिकाऱ्यांना इशारा दिला.जिल्हा परिषदेचे माजी सभापती संदेश सावंत-पटेल यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी विजवितरणच्या कणकवली येथील विभागीय कार्यालयावर धडक दिली. यावेळी अतिरिक्त कार्यकारी अभियंता गिरीश भगत यांच्याशी चर्चा करताना तालुक्यातील ग्रामीण भागातील विजग्राहकाना विजवितरण अधिकारी, कर्मचाऱ्याकडून होणाऱ्या त्रासाबद्दल जाब विचारण्यात आला.संदेश सावंत- पटेल, यांनी १५ सप्टेंबर पर्यंत गणेशोत्सव काळात वीजग्राहकांना वीजबिलवसुलीचा तगादा लावू नये. थकबाकीदार वीज ग्राहकांची वीज जोडणी या काळात खंडित करू नये. श्री गणेशाचे आगमन अंधारात कोणाच्याही घरी होता नये. याची खबरदारी घ्या अशी सक्त सूचना केली. तर जबरदस्तीने कोणत्याही ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित कराल तर आम्ही कायदा हातात घेऊ. असा इशाराच माजी नगरसेवक भूषण परुळेकर यांनी दिला.ग्रामीण भागात विजवितरणचे अधीकारी, कर्मचारी वीज देयक वसुली आणि विज जोडणी तोडण्याची कारवाई करण्यासाठी घरोघरी फिरत आहेत. मात्र कणकवली शहरात वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत होत नाही. याकडे सुनील पारकर यांनी लक्ष वेधले. चर्चेअंती अतिरिक्त कार्यकारी अभियंता भगत यांनी या काळात कोणत्याही ग्राहकाचे वीज कनेक्शन तोडणार नाही असे आश्वासन दिले.दरम्यान, विजवितरणकडून गणेशोत्सव काळात विज जोडणी तोडली तर शिंदे गटाचे संदेश पटेल, भूषण परुळेकर, शेखर राणे, सुनील पारकर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन नागरीकाना करण्यात आले आहे. यावेळी भास्कर राणे, शेखर राणे, राजन म्हाडगुत, दामोदर सावंत, मारुती सावंत, दीपक राऊत आदी उपस्थित होते

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गelectricityवीजGanesh Mahotsavगणेशोत्सव