शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कायदा, सुव्यवस्थेबाबत काळजी घ्या

By admin | Updated: September 2, 2015 23:24 IST

संतोष भिसे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीच्या बैठकीत आवाहन

कणकवली : गणेशोत्सवाच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच कोणती अप्रिय घटना घडू नये यासाठी सर्वांनी सतर्क राहावे. जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या भाविकांची तसेच वाहनचालकांची गैरसोय होऊ नये, यासाठी कणकवली तालुक्यातील प्रत्येक शासकीय विभागाने योग्य पद्धतीने काळजी घ्यावी, असे आवाहन प्रांताधिकारी संतोष भिसे यांनी केले.येथील तहसील कार्यालयात प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी शांतता समितीची आढावा बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. उपविभागीय पोलीस अधिकारी पद्मजा चव्हाण, नगराध्यक्षा अ‍ॅड. प्रज्ञा खोत, तहसीलदार समीर घारे, गटविकास अधिकारी चंद्रसेन मकेश्वर, नायब तहसीलदार आर. जे. पवार, सहायक पोलीस निरीक्षक गीताराम शेवाळे, उमेश वाळके, तीन आसनी रिक्षा संघटनेचे प्रतिनिधी अण्णा कोदे, सहा आसनी रिक्षाचालकांचे प्रतिनिधी राजू पवार, फोंडाघाट सरपंच आशा परब, वीज वितरणचे अभियंता अनंत जोगदंड, संतोष सावंत, रमेश आमडोसकर, सचिन सरंगले, व्ही. आर. शिंदे, पी. व्ही. कांबळे उपस्थित होते. पोलीस, तीनआसनी रिक्षाचालक यांची याबाबत बैठक घेण्यात येईल, असे पोलीस उपविभागीय अधिकारी पद्मजा चव्हाण यांनी सांगितले. भाडे नाकारणाऱ्या चालकांवर कारवाई करावी अशी मागणी केली. तालुक्यात तीन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असून त्यांनी ध्वनिप्रदूषणाचे नियम पाळावेत अशी सूचना केली. एसटीने सर्व बसस्थानकांवर विशेष व्यवस्था केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. रेल्वे स्थानकात एस.टी.च्या जादा गाड्या उपलब्ध करण्याबाबत कणकवली रेल्वेस्थानकात स्वतंत्र नियंत्रण कक्ष उभारण्यात येणार आहे. आरोग्य विभागातर्फे महामार्ग, रेल्वे व एस.टी. बसस्थानकावर विशेष आरोग्य पथके तैनात ठेवण्यात येणार आहेत. शुद्ध पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केल्याची माहिती दिली. वीज वितरणने वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याबरोबर सार्वजनिक ठिकाणी किंवा नागरी वस्तीत असलेल्या पेट्या वा वीजवाहिन्यांचा धोका नागरिकांना होणार नाही याबाबतची सूचना करण्यात आली. (वार्ताहर)परवानगीशिवाय फलक लावू नयेतगणेशोत्सव काळात मुंबई-गोवा महामार्गाच्या दुतर्फा किंवा बाजारपेठेमध्ये वाहनचालकांना त्रास होऊ नये, अशा ठिकाणी डिजिटल फलक उभारण्यात येऊ नयेत. फलक लावण्यासाठी परवानगी घेतली नसल्यास तो तत्काळ काढण्यात यावा. तशी सूचना तालुक्यातील ग्रामपंचायतींबरोबर नगरपंचायतीलाही करण्यात आली आहे. फोंडाघाट तसेच करुळ घाटातील खड्डे भरण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्ण करावेत, अशी सूचना करण्यात आली. रेल्वेस्थानकांवर वाहनांची व्यवस्था करण्यात यावी.