शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

मुलभूत सुविधा, विकासामध्ये कुडाळ शहर पिछाडीवर

By admin | Updated: March 28, 2016 00:07 IST

सध्याची स्थिती : जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण ; ७४ वर्षांची ग्रामपंचायत; अनेक पदे भोगूनही विकासाकडे दुर्लक्ष

रजनीकांत कदम -- कुडाळ  --जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या व एकेकाळी जिल्हा केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुडाळ शहराचा राज्यभरात नावलौकीक आहे. मात्र, त्यामानाने आजपर्यंतच्या राजकीय, सामाजिक व औद्योगिक वाटचालीत कुडाळ शहराचा हवा तसा विकास झालेला नाही. वास्तविक पाहता ७४ वर्षाच्या ग्रामपंचायतीच्या इतिहासात सध्या निवडणूक रिंगणात असलेल्या सर्वच राजकीय पक्षांनी पदे उपभोगली आहेत. मात्र, विकासाबाबत कुणीच पुढाकार घेतलेला दिसत नाही. त्यामुळे नगरपंचायत निवडणुकीत राजकीय पक्षांची आश्वासने मतदारांना कितपत वळवणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. जिल्हा निर्मितीपासून जिल्ह्यासह राज्यात चर्चेत असलेल्या कुडाळ शहराला राज्याच्या राजकीय पटलावर विशेष महत्त्व आहे. त्यामुळे कोकणात येणाऱ्या प्रत्येक घटकाचा कुडाळ शहराला टचअप करावाच लागतो. जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने येथे राज्यातील अनेक नामवंत मंत्री, अनेक वरिष्ठ अधिकारी यांचा कायमच संपर्क येत असतो. त्यामुळे या शहराचा नावलौकीक राज्यात सर्वदूर पोहचला आहे. पण इथल्या मुलभूत सोयी सुविधा ग्रामपंचायतीच्या ७४ वर्षाच्या इतिहासात अजूनही अपूर्णावस्थेतच दिसत आहेत. त्यामुळे याचा फटका स्थानिकांसह, व्यापारीवर्ग, पर्यटक यांना मोठ्या प्रमाणात बसत आहेत. जिल्ह्याची बाजारपेठ म्हणूनही कुडाळची ओळख आहे. पण याचे गांभिर्य इथल्या प्रशासनाने तर घेतले नाहीच पण लोकप्रतिनिधींनीही घेतले नाही. याशिवाय गंभीर बाब म्हणजे ग्रामपंचायतीच्या इतिहासात पदे भोगलेल्या कार्यकर्त्यांचा सध्याच्या नगरपंचायतीतही सहभाग आहे. त्यामुळे कुणाचेच कौतुक करणे वा कुणाला नावे ठेवणे योग्य ठरणार नाही. सर्वांनीच पदे भोगली पण विकासाला बगल दिल्याचेच चित्र शहराच्या सध्याच्या स्थितीवरुन दिसत असल्याचे नागरिकांचे मत आहे. मच्छीमार्केट, बसस्थानक यांच्या इमारती नादुरुस्त झाल्या आहेत. भाजी मार्केटमध्ये कोणीही बसत नाही, शहरात कशाही पद्धतीने वाढत असलेली मोठमोठी बांधकामे मात्र कोणत्या सुविधा कशा ठेवल्या पाहिजेत याचे योग्य नियोजन नाही, त्यामुळे भविष्यात शहरासमोर भेडसावणारे अनेक प्रश्न यांच्यावर योग्य ती उपाययोजना करणारी यंत्रणा असणे गरजेचे आहे. त्यामुळे सजग कार्यकर्ता आणि जागृत नेते यांनाच या निवडणुकीत संधी मिळण्याची शक्यता नागरिकांतून वर्तविण्यात येत आहे. सांडपाणी, कचरा, उद्यानाचा अभाव मोठ्या प्रमाणात लोकसंख्या असलेल्या कुडाळ शहरात लहान मुले यांना खेळण्यासाठी एकही प्रशस्त उद्यान नाही. याठिकाणी मोठे उद्यान बांधण्यात येणार आहे, अशी फक्त सरकार व प्रशासन यांच्याकडून घोषणा केली जाते. तसेच ग्रामपंचायतीने छोट्या पद्धतीत बांधलेल्या उद्यानाचे तीनतेरा वाजले आहेत. शहरातील कचरा टाकायचा कुठे? हा मोठा प्रश्न प्रत्येकवेळी कुडाळ ग्रामपंचायतीसमोर उभा राहत आहे. कारण कुडाळ शहरात नियोजित असे डंपिंग ग्राऊंड नाही. सध्या भंगसाळ नदी किनाऱ्यालगतच्या एका जमिनीत कचरा टाकला जातो. मात्र, या कचऱ्यामुळे नदी प्रदूषित होऊन आजूबाजूच्या रहिवाशांनाही त्रास होतो. त्यामुळे तेथील डंपिंग ग्राऊंडला ग्रामस्थांनी विरोध केला आहे. कुडाळ शहराला पाणी पुरवठा करणारी नळपाणी योजना ही जुनी झाली असून तेथील पाणी साठवणुकीच्या विहिरी टाक्या याही जीर्ण होत चालल्या आहेत. तसेच एप्रिल, मे च्या उत्तरार्धात शहरातील काही भागात पाणी टंचाईचे प्रमाण हल्ली वाढत आहे. शहरातील बऱ्याचशा विहिरी दुरूस्तीच्या प्रतीक्षेत आहेत.कुडाळ शहरात मुलांना खेळण्यासाठी एकही प्रशस्त उद्यान नाही. या ठिकाणी मोठे उद्यान बांधण्यात येणार आहे, अशी फक्त सरकार व प्रशासन यांच्याकडून घोषणा केली जाते. तसेच ग्रामपंचायतीने छोट्या पद्धतीत बांधलेल्या उद्यानाचे तीनतेरा वाजले आहेत.अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणशहरातील वाढत्या लोकसंख्येबरोबर या ठिकाणी अतिक्रमणे व अनाधिकृत बांधकामांचेही प्रमाण वाढत असून ही समस्याही भविष्यात कुडाळ शहरासमोर वाढत आहे. आवश्यक त्या ठिकाणी फुटपाथ नाही. सर्वांनीच पदे भोगली पण आश्वासित विकासाला बगल दिल्याचेच चित्र शहराच्या सध्याच्या स्थितीकडे पाहून नागरिकांतून व्यक्त होत आहे.