शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
"...तर रशियाही अणु चाचण्या करेल";व्लादिमीर पुतीन यांची थेट अमेरिकेला धमकी
4
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
5
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
6
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
7
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
8
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
9
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
10
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
11
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
12
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
13
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
14
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?
15
केएल राहुलचा 'डबल' धमाका! विराट कोहली आणि रोहित शर्माचा कसोटीतील मोठा विक्रम मोडला
16
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
17
World Smile Day: ज्याला मिम मटेरिअल समजता, त्याने नुसतं हसून कमावले ३ मिलियन डॉलर!
18
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
19
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
20
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...

शहीद जवानांच्या नावे गावांना मूलभूत सुविधा

By admin | Updated: March 20, 2016 00:28 IST

वायकर : चिपळूणच्या एलईडी दिव्यास मंजुरी

रत्नागिरी : देशाचे रक्षण करताना आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या जिल्ह्यातील शहीद जवानांच्या गावी त्यांच्या नावे मूलभूत सुविधा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी घेतला आहे. या सुविधांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहेत. त्याचबरोबर चिपळूणमध्ये रस्त्यावर एलईडी दिवे लावण्याचा प्रस्तावही मंजूर केला आहे. शहीद जवानांच्या गौरवशाली कार्याच्या स्मृती जनतेच्या मनात कायम रहाव्यात यासाठी शहिदांच्या गावाला त्यांच्या नावाने मूलभूत सुविधा पुरविण्याचा निर्णय वायकर यांनी घेतला आहे. याअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील भेलसई, चिरणी व कावळे (ता. खेड) येथील गावांना नावीन्यपूर्ण स्मशानशेड, कूपनलिका, सोलर लाईट तसेच आवश्यक इतरही मूलभूत सुविधा पुरविण्याचे आदेश त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहेत. त्याचबरोबर चिपळूण नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांनी केलेल्या मागणीनुसार चिपळूणमधील रस्त्यांवर एलईडी दिवे बसविण्यासाठी ३.५० कोटींचे अनुदान देण्याचा निर्णय वायकर यांनी घेतला आहे. शहरात एल. ई. डी स्ट्रीटलाईट बसविण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून निधी मिळण्याचा प्रस्ताव चिपळूणच्या मुख्य अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला. या कामाच्या अंदाजपत्रकास मुख्य अभियंता (विद्युत), सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई यांच्या कार्यालयाने तांत्रिक मंजुरी दिली आहे. त्यानुसार जिल्हा वार्षिक योजना महाराष्ट्र नगरोत्थान अंतर्गत शहराला एल. ई. डी बसविण्यासाठी वायकर यांनी ३.५० कोटी मंजूर केले आहेत. जनसुविधातंर्गत काडवली (ता. खेड), कुंभारखणी (ता. संगमेश्वर), शृंगारतळी (ता. गुहागर), कसबा (ता. संगमेश्वर) येथे घाट बांधणे, तर भेलसई, कावळे, चिरणी, उधळे व शिव. बु (ता. खेड). ओळी कांबळेवाडी (ता. चिपळूण) येथे सौरऊर्जा पथदिवे बसविण्याचे आदेशही पालकमंत्र्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहेत.