शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

बावनदी पुलाला काठ्यांचा आधार

By admin | Updated: January 3, 2016 00:41 IST

मोठ्या दुर्घटनेची शक्यता : देवरूख - साखरपा मार्गावरील वाहतूक धोकादायक

मार्लेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील देवरुख - साखरपा मार्गावरील बावनदी पुलाच्या तुटलेल्या कठड्याला काठ्यांचा आधार देण्यात आला आहे. या ठिकाणी अपघात झाल्यास मोठी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने याठिकाणी कायमस्वरुपी कठडा बांधावा, अशी मागणी वाहनचालकांमधून होत आहे. देवरुख - साखरपा मार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. हा मार्ग पश्चिम महाराष्ट्राकडे जाण्यासाठी उपयुक्त ठरत असल्यामुळे वाहनचालक याच मार्गाला अधिक पसंती देतात. तसेच पश्चिम महाराष्ट्रातून संगमेश्वर तालुक्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याच्या गाड्या याच मार्गाने येतात. तसेच साखरपा परिसरातील नागरिकही कामानिमित्ताने याच मार्गाने देवरुखात येतात. त्यामुळे या मार्गावर वाहनांची नियमीत गर्दी असते. या मार्गावरील बावनदी पुलाचे कठडे तोडून काही महिन्यांपूर्वी एक ट्रक थेट नदीपात्रात कोसळला होता. सुदैवाने या अपघातातून ट्रकचालक बचावला होता. यावेळी ट्रकचा अक्षरश: चक्काचूर झाला होता. यानंतर पुलाच्या तुटलेल्या कठड्याला सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत काठ्यांचा आधार देण्यात आला होता. अद्यापही हा काठ्यांचा आधार कायम आहे. या मार्गावर वाहनांची कायम वर्दळ असल्यामुळे या पुलावर दुर्दैवाने अपघात घडल्यास मोठी दुर्घटना घडू शकते. यासाठी पुलाच्या कठड्याला असलेल्या काठ्यांच्या आधाराऐवजी या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने कायमस्वरुपी कठडा बांधावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. सद्यस्थितीला पुलाच्या कठड्याला देण्यात आलेला काठ्यांचा आधार कमकुवत ठरत आहे. त्यामुळे या ठिकाणी तत्काळ सिमेंट कठडा बांधणे आवश्यक आहे. (वार्ताहर)