शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठीच बँकेची धोरणे

By admin | Updated: August 6, 2015 22:02 IST

सतीश सावंत : जिल्हा बँकेच्या दोडामार्ग शाखेतील ‘झरे २ पुनर्वसन’च्या विस्तारित शंभराव्या सेवेचे उद्घाटन

कसई दोडामार्ग : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा विस्तार जिल्ह्यात झपाट्याने होत आहे. सर्व प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करून जनतेला सर्व सेवा बँकेच्या माध्यमातून दिल्या जात आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आवश्यक धोरणे राबविण्यात येणार आहेत. यासाठी सर्वांनी सांघिक काम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी केले. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दोडामार्ग शाखेच्या झरे २ पुनर्वसन विस्तारित शंभराव्या सेवेचा उद्घाटन सोहळा बुधवारी सरगवे खंडोबा सभागृहात आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक म्हणून जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत बोलत होते. यावेळी सावंत म्हणाले, सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात फळ प्रक्रिया उद्योगधंदे आणण्यासाठी या बँकेच्यावतीने प्रयत्न केले जाणार आहेत. जिल्ह्यातील काजू जिल्ह्याबाहेर जाऊ नये यासाठी प्रोसेसिंग प्रत्येक तालुक्यात व्हावे, यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत. दोडामार्ग तालुक्यातील बऱ्याचशा जमिनी शेतकऱ्यांनी परप्रांतीयांना विकल्या. तेथे परप्रांतीयांनी मोठ्या प्रमाणात रबर लागवड केली आहे. स्वत:च्या जमिनी न विकता स्वत: शेतकऱ्यांनी रबर लागवडीकडे वळावे. यासाठी जिल्हा बँक सहकार्य करेल. येत्या सप्टेंबर, आॅक्टोबर दरम्यान आजारपणाने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना १००० रुपयांमध्ये ५०,००० रुपयांची औषधोपचारासाठी आर्थिक मदत इन्शुरन्सच्या माध्यमातून देण्यासाठी नवीन योजना अमलात आणली जाणार असल्याचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी सांगितले.बँकेचे उपाध्यक्ष सुरेश दळवी, संचालक प्रकाश गवस, डॉ. प्रसाद देवधर, आदींनी मनोगते व्यक्त केले. यावेळी सतीश सावंत, सुरेश दळवी, आदींसह सहकारी संचालक, प्रगतशील शेतकरी, तालुक्यातील विविध सोसायटींचे चेअरमन, सदस्य, काजू, केळी बागायतदारांचा शाल, श्रीफळ व नारळाचे रोप देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सहसंचालक प्रकाश गवस, भगीरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर, झरे २ सरपंच अपर्णा आयनोडकर, झरेबांबर सरपंच सुरेखा जंगले, पाल पुनर्वसन झरे २ सरपंच गीतांजली राणे, संचालक विद्याप्रसाद बांदेकर, आत्माराम ओटवणेकर, काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र निंबाळकर, नूतन अध्यक्ष प्रेमानंद देसाई, जिल्हा परिषद सदस्य एकनाथ नाडकर्णी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गोपाळ गवस, कृतिका सुतार, विलास सावंत, सह्याद्री विकास संस्थेचे चेअरमन चंद्रशेखर देसाई, आदी उपस्थित होते. (वार्ताहर)