शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

बँकेच्या सत्तेच्या चाव्या पुन्हा ‘सहकार’कडेच

By admin | Updated: May 8, 2015 00:07 IST

‘सहकार’ला १५ जागा : शिवसेनेला पाच; चोरगेंचा अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा

रत्नागिरी : जिल्हा बॅँक निवडणुकीत मतदारांनी सत्तेच्या चाव्या पुन्हा एकदा सहकार पॅनेलच्याच हाती सोपविल्या आहेत. २१ पैकी २० जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सहकार पॅनेलला १५ जागांवर विजय मिळाला असून, बिनविरोध निवड झालेल्या एका जागेमुळे सहकारच्या संचालकांची संख्या १६ झाली आहे. त्यामुळे डॉ. तानाजी चोरगे पुन्हा अध्यक्ष होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गतवेळी दोन संचालक असलेल्या शिवसेनेने मुसंडी मारत पाच जागा पटकावल्या. गुरुवारी सकाळी आठ वाजता येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील अल्पबचत सभागृहात बॅँक निवडणुकीच्या मतमोजणीस प्रारंभ झाला. त्यानंतर तासाभरात पहिले सात निकाल लागले. त्यात शिवसेनेला चार जागा मिळाल्याने शिवसंकल्प पॅनेलचा हुरूप वाढला आणि काही काळ सत्ताधारी सहकार पॅनेलमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. मात्र, त्यानंतर सहकार पॅनेलची अनेक जागांवर सरशी झाली. सेनेच्या जागा चारवरून पाचपर्यंतच पोहोचल्या, तर सहकार पॅनेलने तीन जागांवरून १६ जागांपर्यंत मजल मारली. जिल्हा बॅँकेत आता शिवसंकल्पच्या पाच संचालकांमुळे प्रबळ विरोधी पक्ष उदयास आला आहे. या निवडणुकीत सत्ताधारी सहकार पॅनेलला १९, तर शिवसेनेला ९ जागांची अपेक्षा होती. मात्र, दोन्ही बाजूंचा राजकीय अंदाज मतदारांनी चुकवला आहे. रत्नागिरी, लांजा, गुहागर, दापोली या चार तालुका कृषी मतदारसंघांत व जिल्ह्याच्या दुग्ध मतदारसंघात शिवसेनेने मुसंडी मारली. या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष डॉ. तानाजी चोरगे, उपाध्यक्ष बाबाजी जाधव, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम, मच्छिमार नेते अमजद बोरकर, चिपळूण अर्बन बँकेचे अध्यक्ष संजय रेडीज, उद्योजक किरण सामंत, जयवंत जालगावकर, अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांचा प्रमुख विजयी उमेदवारांत समावेश आहे. सहकारच्या गुहागर व लांजा या खात्रीच्या जागा शिवसंकल्पने जिंकून सहकार पॅनेलला धक्का दिला आहे. गुहागरमधून सहकारचे विद्यमान संचालक भालचंद्र बिर्जे यांना शिवसंकल्पचे अनिल जोशी यांनी पराभूत केले. लांजा मतदारसंघातून शिवसंकल्पच्या आदेश आंबोळकर यांनी सहकारच्या सुरेश साळुंखेंचा पराभव केला. मात्र, ज्या जागेवर जिंकण्याबाबत शिवसेनेला आशा होती, त्या संगमेश्वर मतदारसंघातून सहकार पॅनेलने आपली जागा दुप्पट मतांनी राखली. येथून सहकारचे राजेंद्र सुर्वे हे ३१ मते मिळवून विजयी झाले. प्रतिस्पर्धी विलास चाळके यांना केवळ १७ मते मिळाली. निवडणूक अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी प्रसाद उकर्डे व सहायक निवडणूक अधिकारी म्हणून बी. के. पाटील यांनी काम पाहिले.चोरगेंची अनुपस्थिती जाणवलीमतमोजणी सुरू असताना सहकार पॅनेलचे सर्व नेते उपस्थित होते. मात्र, विद्यमान अध्यक्ष व पॅनेलप्रमुख डॉ. तानाजी चोरगे रुग्णालयीन उपचारांमुळे अनुपस्थित होते. उपाध्यक्ष बाबाजी जाधव व शेखर निकम हे यावेळी सर्व धुरा वाहत होते. मतमोजणीच्या ठिकाणी माजी राज्यमंत्री रवींद्र माने, माजी आमदार सुभाष बने, आमदार उदय सामंत, आदी उपस्थित होते. ननिवडणुकीतील नाती-गोती...जिल्हा बॅँक निवडणुकीत माजी राज्यमंत्री, सध्या राष्ट्रवादीत असलेले रवींद्र माने यांची पत्नी नेहा माने तसेच आमदार उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे विजयी झाले. मात्र, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक यांची पत्नी, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष रचना महाडिक यांचा महिला राखीव मतदारसंघात पराभव झाला.