शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

बांदा दशक्रोशीला वादळाचा तडाखा

By admin | Updated: May 7, 2017 23:48 IST

बांदा दशक्रोशीला वादळाचा तडाखा

लोकमत न्यूज नेटवर्कबांदा : बांदा शहर व दशक्रोशीतील गावांना शनिवारी रात्री चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला. सुमारे २० मिनिटांच्या वादळाने होत्याचे नव्हते झाले. या वादळी पावसात शेकडो घरांवर झाडे उन्मळून पडल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ठिकठिकाणी झाडे उन्मळून वीज वाहिन्यांवर पडल्याने वीजवाहिन्या जमिनीवर तुटून पडल्या होत्या. त्यामुळे दशक्रोशीतील वीज रात्रीपासूनच गायब झाली आहे. केळी बागायतींसह माड, पोफळी, काजू, आंबा बागायतींची मोठ्या प्रमाणात पडझड झाली. प्रशासकीय यंत्रणेने रविवार हा सुटीचा दिवस असल्याने नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम हाती घेतल्याचे दिसत नव्हते. क्षणार्धात होत्याचे नव्हते झाल्याने स्थानिकांमध्ये प्रचंड घबराटीचे वातावरण होते. बांद्यासह डेगवे व डिंगणे-धनगरवाडी परिसराला या वादळी पावसाचा सर्वाधिक फटका बसला. वीज खांब उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. एसटीच्या असनिये, घारपी, दाभिल, कोनशी या गावांमध्ये वस्तीसाठी गेलेल्या बसेस मार्गावर झाडे पडल्याने अर्ध्यावरच अडकून पडल्या आहेत.बांदा शहरासह दशक्रोशीला शनिवारी रात्री साडेआठ वाजता चक्रीवादळाचा जोरदार फटका बसला. बांदा शहर, शेर्ला, डेगवे, तांबोळी, डिंगणे, गाळेल, डोंगरपाल, नेतर्डे, इन्सुली, वाफोली, विलवडे, सरमळे आदी गावांत चक्रीवादळाचा प्रभाव अधिकच जाणवला. ठिकठिकाणी झाडे उन्मळून घरांवर पडल्याने घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ठिकठिकाणी घरे व दुकाने यांची छपरे वादळी पावसाने उडून गेल्याच्या घटनादेखील घडल्या आहेत. केळी बागायतींसह माड, पोफळी, काजू बागायतींचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वीज वाहिन्यांवर झाडे मोडून पडल्याने वीज खांबांसह वाहिन्या तुटून रस्त्यावर पडल्या होत्या. दशक्रोशीत रात्रीपासूनच वीज गायब झाली असून बांदा शहरात वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले होते. अन्यत्र ग्रामीण भागात मात्र वीजवाहिन्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याचे दिसत नव्हते. सुमारे ७० टक्क्यांहून अधिक भागात वीजवाहिन्या तुटल्याने पुढील चार दिवस हा भाग अंधारात राहणार आहे.डेगवे, फणसवाडी येथील लक्ष्मी गोविंद डेगवेकर यांच्या नवीनच बांधलेल्या घरावर झाड मोडून पडल्याने छपराचे पूर्णपणे नुकसान झाले. तसेच अर्जुन कृष्णा वारंग, प्रसाद नकुल देसाई, बळिराम तुकाराम देसाई, साबाजी राघोबा देसाई, सुनीता नकुल देसाई, सुवर्णलता सहदेव देसाई, रावजी राजाराम देसाई यांच्या घरांवर झाडे उन्मळून पडल्याने छपरांचे नुकसान झाले. तसेच जांभळवाडीतील लक्ष्मी नवसो देसाई, वरची फणसवाडी येथील शिवराम विठ्ठल देसाई, भागिरथी कृष्णा देसाई यांच्या घरांवर झाडे पडल्याने नुकसान झाले. डेगवे उपसरपंच मधुकर देसाई यांच्या काजू बागेतील मांगराचे पत्रे उडून सुमारे १०० मीटर लांब पडले. यावरूनच वादळाची प्रचिती येते. बागेतील बहुतांशी काजू कलमेही उन्मळून पडली. डेगवे सोसायटीचे चेअरमन प्रवीण देसाई यांच्या काजू बागेतील झाडेही मोडून पडल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. मोयझरवाडीतील बाबा देसाई यांच्या बागेचीही मोठ्या प्रमाणात पडझड झाली. रविवार सुटीचा वार असतानाही डेगवे तलाठी किरण गजीनकर यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम हाती घेतले. इन्सुलीतील गीतांजली अंकुश माधव, दिनेश दत्ताराम गावडे, आत्माराम कोठावळे, प्रदीप सावंत, हेमंत राणे यांच्या घरांवर झाडे पडल्याने छपरांचे नुकसान झाले.बांदा शहरातही चक्रीवादळाचा फटका बसला. आळवाडा परिसरात वीजवाहिन्या मुख्य रस्त्यावरच तुटून पडल्या होत्या. बांद्यात श्यामसुंदर शंकर गवस, प्रतिभा प्रभाकर म्हावळणकर, कृष्णा विष्णू मांजरेकर, राजेंद्र हरिश्चंद्र पडते, शोभा संभाजी कदम, आनंदी अनंत भाईप, विलास हरी बांदेकर, देवयानी दिनानाथ शिंदे, वीरेंद्र हरी बांदेकर, यशवंत रमेश आळवे, विजया विजयानंद तर्पे, हनुमंत मुरारी सावंत, रूपेश आनंद पाटकर, तातोबा सखाराम वराडकर, सरिता गणपत बहिरे, संजय सीताराम धुरी आदींचे नुकसान झाले. अण्णा आळवे यांच्या गाडीच्या शेडवर आंब्याचे झाड पडून कारच्या बोनेटचे नुकसान झाले. शेर्ला बाजारवाडी येथील दाजी पेडणेकर व उत्तम पेडणेकर यांच्या घरांवर आंब्याचे झाड पडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बांदा आळवाडी येथील महेश तळवणेकर यांच्या दुकानावर झाड पडून नुकसान झाले. देऊळवाडी येथील तुकाराम मोरजकर यांच्या घरावरील पत्रे वादळात उडाल्याने नुकसान झाले. तसेच एकनाथ परब यांच्या घरावर फणस पडून छपरासह टीव्हीचेही नुकसान झाले. बांदा शहराला वीजपुरवठा करणाऱ्या ११ केव्ही लाईनवर चार ठिकाणी झाडे पडल्याने शहराचा वीजपुरवठा खंडित झाला. मुसळधार पावसासह वाऱ्याचा वेग अधिक असल्याने परिसरातील विजेचे खांब अक्षरक्ष: उन्मळून पडले. त्यामुळे बांदा दशक्रोशीतील गावांमधील वीजपुरवठा खंडित झाला. बांदा शहराला जोडणाऱ्या विविध ग्रामीण मार्गांवर झाडे उन्मळून पडल्याने बांदा शहराकडे येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. यामध्ये एसटी बसेसही अडकल्याने अनेकांची तारांबळ उडाली.