शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

corona virus-कोरोनाच्या भीतीने कुणकेरी हुडोत्सवात बाहेरच्यांना बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 12:38 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, कुणकेरी येथील हुडोत्सवाला तीन गावांबाहेरील लोकांना बंदी घालण्यात आली आहे. तसेच मंगळवारचा आठवडा बाजार पुढील आदेश होईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देकोरोनाच्या भीतीने कुणकेरी हुडोत्सवात बाहेरच्यांना बंदीबैठकीत शासनाची विनंती, ग्रामस्थांकडून सकारात्मक प्रतिसाद

सावंतवाडी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, कुणकेरी येथील हुडोत्सवाला तीन गावांबाहेरील लोकांना बंदी घालण्यात आली आहे. तसेच मंगळवारचा आठवडा बाजार पुढील आदेश होईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.याबाबत शनिवारी सायंकाळी उशिरा तहसीलदार राजाराम म्हात्रे व पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांनी कुणकेरी येथील ग्रामस्थांची बैठक घेऊन ग्रामस्थांना विनंती केली. त्याला ग्रामस्थांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. तर आठवडा बाजाराबाबत तहसीलदार नगरपालिकेला पत्र देणार आहेत.कोरोना व्हायरसने जगात सर्वत्र थैमान घातले आहे. यातून भारत देशही सुटला नाही. भारतामधील अनेक शहरापर्यंत हा व्हायरस जाऊन पोहोचला असल्याने राज्य सरकारने अनेक खबरदारीचे उपाय म्हणून महत्त्वाची अशी गर्दीची ठिकाणे काही दिवसांसाठी बंद केली आहेत.तसेच जत्रा, आठवडा बाजार आदी गर्दीच्या ठिकाणीही बंदी घातली आहे.

याच पार्श्वभूमीवर रविवारी प्रसिद्ध असा कुणकेरीचा हुडोत्सव असतो. पण या ठिकाणी गोवा तसेच कर्नाटक व जिल्ह्यातून अनेक लोक येतात. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ शकते. याच भीतीने शनिवारी तहसीलदार राजाराम म्हात्रे व पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांनी गावात जाऊन ग्रामस्थ, सरपंच व पोलीस पाटील यांची संयुक्त बैठक घेतली.या बैठकीत शासनाने जे निर्बंध आणले आहेत, त्यांची माहिती सर्वांना दिली. त्यानंतर ग्रामस्थ व जिल्हा प्रशासनाने संयुक्तपणे कुणकेरी हुडोत्सव काळात परिसरातील तीन गावांमधील सोडून बाहेरच्यांना कुणकेरी गावात हुडोत्सव काळात बंदी असणार आहे, असे जाहीर केले आहे.कुणकेरी गावाच्या सीमेवर रविवारी सकाळपासून म्हणजे ९ ते रात्री ७ वाजेपर्यंत बाहेरच्यांना बंदी असणार आहे, असे यावेळी तहसीलदार म्हात्रे यांनी जाहीर केले आहे. तर मंगळवार आठवडा बाजाराबाबतही महत्त्वाचा निर्णय घेतला असून, पुढील एक महिन्यासाठी हा आठवडा बाजारच बंद करण्यात आला आहे. बाजाराच्या निमित्ताने तब्बल दोन ते अडीच हजार नागरिक एकत्र येतात. यामध्ये बाहेरच्या लोकांचा मोठा सहभाग असतो. त्यामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.हा आठवडा बाजार आता एप्रिल अखेरपर्यंत शासनाने नियमांमध्ये शिथिलता आणली तर सुरू केला जाईल, असे यावेळी म्हात्रे यांनी सांगितले. प्रशासनाच्यावतीने हॉटेल तसेच व्यायामशाळा आदीबाबत गंभीर निर्णय घेण्यात येत असून, तशा नोटिसाही देण्यात येणार आहेत. आठवडा बाजाराबाबत नगरपालिकेला माहिती देण्यात येणार असल्याचे तहसीलदार म्हात्रे यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोनाHoliहोळीsindhudurgसिंधुदुर्ग