शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

कणकवली शहरात परप्रांतीय सलून कारागिराना प्रतिबंध करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 18:40 IST

मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे अनेक सलून बंद करावी लागली आहेत. त्यामुळे अनेक नाभिक बांधव बेकार झाले आहेत. या पार्श्वभूमिवर कणकवली शहरासह इतर भागात दाखल होणाऱ्या परप्रांतीय सलून कारागीराना प्रतिबंध करण्यात यावा. तसेच स्थानिक नाभिक बांधवाना बेरोजगार होण्यापासून वाचवावे.अशी मागणी एका निवेदनाद्वारे कणकवली तालुका नाभिक मंडळाच्यावतीने कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्याकडे करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे कणकवली शहरात परप्रांतीय सलून कारागिराना प्रतिबंध कराकणकवली नाभिक मंडळाचे नगराध्यक्षांना निवेदन

कणकवली : मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे अनेक सलून बंद करावी लागली आहेत. त्यामुळे अनेक नाभिक बांधव बेकार झाले आहेत. या पार्श्वभूमिवर कणकवली शहरासह इतर भागात दाखल होणाऱ्या परप्रांतीय सलून कारागीराना प्रतिबंध करण्यात यावा. तसेच स्थानिक नाभिक बांधवाना बेरोजगार होण्यापासून वाचवावे.अशी मागणी एका निवेदनाद्वारे कणकवली तालुका नाभिक मंडळाच्यावतीने कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्याकडे करण्यात आली आहे.दरम्यान , वरील आशयाचे निवेदन नाभिक मंडळाच्यावतीने नगरपंचायत मुख्याधिकारी , उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, कणकवली तालुका व्यापारी महासंघ, कणकवली पोलीस निरीक्षक यांनाही देण्यात आले आहे.यावेळी नाभिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर, तालुका सचिव प्रवीण कुबल, खजिनदार चंद्रशेखर चव्हाण, दशरथ चव्हाण, महेश चव्हाण, सुमित लाड, संजय कुबल, अरुण चव्हाण, मनोज चव्हाण, सल्लागार सुभाष चव्हाण आदि संघटनेचे मुख्य कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरण सुरु असल्याने बरेचसे नाभिक बांधव विस्थापित झाले आहेत. काही नाभिक बांधवांना नवीन जागांची भाडी परवडत नसल्याने त्यांना आपला धंदाही करता येईनासा झाला आहे. त्यामुळे त्यांच्यावर बेकारीची कुऱ्हाड कोसळलेली आहे. काहींनी हमाली सारखी कामे करून तात्पुरत्या स्वरुपात उदरनिर्वाह करण्याचे ठरवले आहे. असे घडत असताना जिल्ह्यातील कणकवलीसह काही तालुक्यांमध्ये परप्रांतीय सलून कारागीर ( भैय्या) लोकांचे आगमन झालेले आहे.तसेच नाभिक समाजा व्यतिरिक्त इतर लोक आपल्या जागेच्या उपलब्धीनुसार सलून दुकाने थाटत आहेत. त्यात या भैय्यांना आणून ठेवले जात आहे. त्यामुळे या परप्रांतीयांनी सलून व्यवसायामध्येही चंचुप्रवेश करण्यास सुरुवात केली आहे.त्याचा परिणाम येथील पारंपारिक नाभिक समाजावर पडत आहे. त्यांची रोजीरोटी देणाऱ्या व्यवसायावर संक्रांत आली आहे. या गोष्टीचा वेळीच प्रतिबंध होण्याच्या दृष्टीने नाभिक समाजाने या परप्रांतीय भैय्या लोकांचा प्रतिकार करण्याचे ठरवले आहे. जेथे जेथे अनाभिक लोक अशा प्रकारे पार्लर उभारण्याचा प्रयत्न करतील त्यांनी फक्त आपल्या भागातील पारंपारिक नाभिकांना तेथे काम करण्यास ठेवल्यास नाभिक संघटनेचा त्यांना पाठींबा राहणार आहे.

जर त्यांनी नाभिक संघटनेला विश्वासात न घेता दुकाने थाटून त्यात परप्रांतीय भैय्या लोकांना आणून ठेवल्यास त्यास नाभिक संघटना कडाडून विरोध करणार आहे. यावेळी उद्भवणाऱ्या परिस्थितीस प्रशासन तसेच सलून थाटणारे नाभिक समाजा व्यतिरिक्त असलेले लोकच कारणीभूत असतील. असेही या निवेदन म्हटले आहे. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाsindhudurgसिंधुदुर्ग