शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
2
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
3
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
4
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
5
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
6
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
7
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
8
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
9
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
10
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
11
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
12
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
13
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
14
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
15
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
16
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
17
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
18
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
19
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
20
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली

उत्तरेत बाळासाहेबांच्या आमदारकीचा ‘चौकार’

By admin | Updated: October 19, 2014 22:58 IST

गुलाल उधळून व फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला.

कऱ्हाड उत्तर -कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी २४ फेऱ्यांमध्ये पार पडली. मतमोजणीवेळी मताधिक्याचा आकडा प्रत्येक फेरीला कमी जास्त होत होता. अखेर एकोणिसाव्या फेरीत बाळासाहेबांनी २० हजार ३८२ चे मताधिक्य मिळविले, आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला. आमदार पाटील यांच्यावरच गुलाल पडणार असल्याचे त्यावेळी निश्चित झाले. चोविसाव्या फेरीअखेर आमदार बाळासाहेब पाटील यांना २० हजार ५०७ मतांनी विजयी घोषित करण्यात आले. बाळासाहेबांनी आमदारकीचा चौकार मारताच कार्यकर्त्यांकडून गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. निकाल ऐकण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांनाही जागा ठरवून देण्यात आल्या होत्या. पोलिसांच्या सूचनेनुसार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते सहकार भवन ते बैलबाजार मार्गावर, काँग्रेसचे कार्यकर्ते कार्वे नाका ते गोळेश्वर मार्गावर तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कार्वे नाका ते तासगावकडे जाणाऱ्या मार्गावर थांबून होते. सकाळी सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास मतमोजणीची पहिली फेरी पार पडली. या फेरीत राष्ट्रवादीच्या आमदार बाळासाहेब पाटील यांना २ हजार ९६५, काँग्रेसच्या धैर्यशील कदम यांना १ हजार ६४५, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मनोज घोरपडे यांना ३ हजार ५८८, बसपाच्या उदय कांबळे यांना २६, शिवसेनेच्या नरेंद्र पाटील यांना २१८, मनसेच्या राजू केंजळे यांना ९८, बविपाच्या प्रकाश कांबळे यांना ३४ मते मिळाली. पहिल्याच फेरीत स्वाभिमानीच्या मनोज घोरपडे यांनी ६२३ मतांची आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या फेरीअखेर बाळासाहेब पाटील यांना ५ हजार ४५०, धैर्यशील कदम यांना ४ हजार २५ तर मनोज घोरपडे यांना ५ हजार ८०२ मते मिळाली. दुसऱ्या फेरीअखेरही मनोज घोरपडे आघाडीवर राहिले. त्यांना ३५२ मताधिक्य राहिले. तिसऱ्या फेरीअखेर बाळासाहेब पाटील यांना ८ हजार २३१, धैयशील कदम यांना ५ हजार २२९ तर मनोज घोरपडे यांना ८ हजार ३८४ मते मिळाली. या फेरीअखेर घोरपडेंच्या मताधिक्याचा आकडा घटला. त्यांना फक्त १५३ मते जादा मिळाली. चौथ्या फेरीत पुन्हा त्यांचे मताधिक्य वाढले. चौथ्या फेरीअखेर घोरपडेंना ९४५ चे मताधिक्य मिळाले. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले. मात्र, त्यांचा हा आनंद जास्त काळ टिकू शकला नाही. पाचव्या फेरीत आमदार बाळासाहेब पाटील यांना मताधिक्य मिळाले. या फेरीत आमदार पाटील यांना १३ हजार ५३१, धैर्यशील कदम यांना ८ हजार ९२५ तर मनोज घोरपडेंना १३ हजार ९७ मते मिळाली. आमदार पाटील यांना ४३४ मतांची आघाडी मिळाली. या फेरीनंतर आमदार पाटील समर्थकांचा जीव भांड्यात पडला. मतमोजणी केंद्राबाहेर निकाल ऐकत थांबलेल्या कार्यकर्त्यांमध्ये चुळबूळ सुरू होती. सहाव्या फेरीअखेर आमदार पाटील यांना १६ हजार ५४ मते मिळाली, तर धैर्यशील कदम यांना १० हजार ८९१ व मनोज घोरपडेंना १५ हजार ३६२ मते मिळाली. या फेरीअखेर बाळासाहेबांचे मताधिक्य दोनशेंनी वाढले. ते ६९२ मतांनी आघाडीवर राहिले. सातव्या फेरीत मात्र त्यांचे मताधिक्य कमी होऊन ३५१ वर आले. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून चौथ्या फेरीपर्यंत मताधिक्यात मनोज घोरपडे पहिल्या, बाळासाहेब पाटील दुसऱ्या, तर काँग्रेसचे धैर्यशील कदम तिसऱ्या स्थानावर राहिले. पाचव्या फेरीत मात्र मताधिक्याचा क्रम बदलला. आमदार बाळासाहेब पाटील प्रथम, मनोज घोरपडे द्वितीय तर धैर्यशील कदम तिसऱ्याच स्थानावर राहिले. आठव्या फेरीत आमदार बाळासाहेब पाटील यांना १८ हजार ६६०, धैर्यशील कदम यांना १२ हजार १६६ तर मनोज घोरपडे यांना १८ हजार २७१ मते मिळाली. या फेरीअखेरही बाळासाहेब पाटील यांचे मताधिक्य कमी म्हणजेच ३८९ होते. आठव्या फेरीनंतर मात्र त्यांनी चांगलीच आघाडी घेतली. आठव्या फेरीअखेर त्यांना १ हजार ७४१, नवव्या फेरीअखेर ३ हजार ३७५, दहाव्या फेरीअखेर ४ हजार ७५२ तर अकराव्या फेरीअखेर ६ हजार १२७ चे मताधिक्य मिळाले. बाराव्या फेरीत मात्र त्यांचे मताधिक्य कमी झाले. तसेच मनोज घोरपडे व धैर्यशील कदम यांची मताची आकडेवारी बरोबरीत येण्यास सुरुवात झाली. अकराव्या फेरीपर्यंत मनोज घोरपडे दुसऱ्या तर धैर्यशील कदम तिसऱ्या स्थानावर होते. त्यानंतर मात्र हळूहळू धैर्यशील कदम यांनी मनोज घोरपडेंपेक्षा आघाडी घेण्यास सुरुवात केली. तेराव्या फेरीत बाळासाहेब पाटील यांना ९ हजार १६४ मतांची आघाडी मिळाली. तर चौदाव्या फेरीत त्यांनी मताधिक्याचा दहा हजारांचा आकडा ओलांडला. पंधराव्या फेरीअखेर बाळासाहेबांचे मताधिक्य १४ हजार १६१ वर जाऊन पोहोचले. सोळाव्या फेरीअखेर बाळासाहेब पाटील यांना ५० हजार २७३, धैर्यशील कदम यांना ३४ हजार १९६, तर मनोज घोरपडेंना ३४ हजार ५९८ मते मिळाली. आमदार बाळासाहेब पाटील १५ हजार ६७५ मतांनी आघाडीवर राहिले. सतराव्या फेरीअखेर मनोज घोरपडेंना मागे टाकत धैर्यशील कदम दुसऱ्या स्थानावर आले. त्यांना ३६ हजार ६७०, तर मनोज घोरपडेंना ३५ हजार ५४७ मते मिळाली. आमदार बाळासाहेब पाटील सतराव्या फेरीअखेर १७ हजार २६४ मतांनी आघाडीवर राहिले. त्यानंतर प्रत्येक फेरीत त्यांचे मताधिक्य वाढत राहिले. तसेच धैर्यशील कदम यांनी आपले दोन नंबरचे स्थानही कायम ठेवले. मनोज घोरपडे तिसऱ्या क्रमांकावर गेले. विसाव्या फेरीअखेर बाळासाहेब पाटील २० हजार ८१६, एकविसाव्या फेरीअखेर २० हजार १०, बाविसाव्या फेरीअखेर २० हजार ११७, तेविसाव्या फेरीअखेर १९ हजार ६०३ मतांनी आघाडीवर राहिले. शेवटच्या चोविसाव्या फेरीअखेर आमदार बाळासाहेब पाटील यांना ७७ हजार ९४३, धैर्यशील कदम यांना ५७ हजार ६६३, तर मनोज घोरपडेंना ४३ हजार ७४९ मते मिळाली. टपालाद्वारे झालेल्या मतदानात बाळासाहेबांना ३८१, धैर्यशील कदम यांना १५४, तर मनोज घोरपडे यांनाही १५४ मते मिळाली. आमदार बाळासाहेब पाटील २० हजार ६६१ मतांनी विजयी झाले. आमदार पाटील यांच्या विजयानंतर गुलाल उधळून व फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला. कऱ्हाड उत्तर मतदारसंघात एकूण १ लाख ९० हजार ५५१ मते नोंदविली होती. त्यापैकी १ हजार ५६ मते नोटाला नोंदविली गेल्यामुळे एकूण १ लाख ८९ हजार ४१० मते वैध ठरली.