शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रानडुकराचे मांस विक्रीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपींना जामीन मंजूर

By सुधीर राणे | Updated: February 26, 2024 17:49 IST

कणकवली : रानडुकराचे मांस विक्रीच्या गुन्ह्यातील आरोपी गुरुनाथ येंडे आणि चंद्रकांत शिरवलकर यांची कणकवली न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या जामिनावर ...

कणकवली : रानडुकराचे मांस विक्रीच्या गुन्ह्यातील आरोपी गुरुनाथ येंडे आणि चंद्रकांत शिरवलकर यांची कणकवली न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता केली. फोंडाघाट येथे रानडुकराचे मांस विक्री करत असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. त्यानुसार वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र घुणकीकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने आरोपी येंडे आणि शिरवलकर यांना रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर दोन्ही आरोपीना दोन वेळा वनकोठडी मिळाली होती. वनकोठडीची मुदत संपल्यावर सोमवारी आरोपींना कणकवली न्यायालयात हजर करण्यात आले.दरम्यान, या गुन्ह्यातील राधानगरी येथील मुख्य आरोपी अद्याप सापडला नसल्याचे कारण देत तपासी अधिकाऱ्यांकडून पुन्हा वनकोठडीची मागणी करण्यात आली. त्याला हरकत घेत अॅड. मिलिंद सावंत यांनी दोन्ही आरोपींनी तपासकामात सहकार्य केले आहे. राधानगरी येथील मुख्य आरोपीचा शोध घेण्यासाठी पुरेशी वनकोठडी देण्यात आली असून तपासकामासाठी पुरेसा अवधी मिळाला आहे. आदी मुद्दे न्यायालयाच्या निदर्शनास आणत आरोपीना वनकोठडी ऐवजी न्यायालयीन कोठडी सुनावण्याची मागणी केली. अॅड.मिलिंद सावंत यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून कणकवली न्यायाधीश शेख यांनी दोन्ही आरोपीना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर अॅड. मिलिंद सावंत यांनी दोन्ही आरोपींची जामिनावर मुक्तता करण्यासाठी युक्तिवाद केला.तपासकामी सहकार्य करणे, पुन्हा असा गुन्हा न करणे आदी शर्तींवर दोन्ही आरोपींची १५ हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता करण्यात आली.आरोपींच्या वतीने अॅड. मिलिंद सावंत यांनी यशस्वी युक्तिवाद केला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCourtन्यायालय