शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

बबन साळगावकर शिवसेनेच्या वाटेवर?

By admin | Updated: October 26, 2016 22:48 IST

केसरकरांसोबत सकारात्मक चर्चा : नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीचे संकेत

सावंतवाडी : विद्यमान नगराध्यक्ष बबन साळगावकर व पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यात मंगळवारी रात्री झालेल्या राजकीय चर्चेनंतर सावंतवाडीच्या राजकारणाला नाट्यमय वळण लागले असून शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून बबन साळगावकर यांना पसंती मिळण्याची दाट शक्यता आहे. पालकमंत्री केसरकर यांनी एक तास साळगावकरांची मनधरणी करून त्यांना शिवसेनेकडूनच निवडणूक लढवावी असा जोरदार आग्रह धरला. त्याला साळगावकर यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहीती पुढे आली आहे.विद्यमान नगराध्यक्ष बबन साळगावकर कोणत्या पक्षात जाणार? काय निर्णय घेणार? याची उत्सुकता शहरवासीयांबरोबरच जिल्हावासीयांना लागून राहिली आहे. मात्र, साळगावकर यांनी अद्यापही आपला निर्णय झाला नाही, असे सांगत निर्णय गुलदस्त्यात ठेवला आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या मुदतीचे अंतिम दोन दिवस राहिल्याने साळगावकरांनी कोणता तरी निर्णय घ्यावा, अशी जोरदार मागणी शहरवासीयांतून होत होती. त्यातच मंगळवारी रात्री उशिरा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी साळगावकर यांच्याबरोबर गवळी तिठा येथील कार्यालयात बैठक घेतली. ही बैठक एक तास चालली. त्यानंतर पालकमंत्री केसरकर आणि नगराध्यक्ष साळगावकर हे हसतमुखाने बाहेर आले. पालकमंत्री केसरकर यांनी साळगावकर यांची मनधरणी केली. आपण नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेतून उमेदवारी अर्ज दाखल करावा. आपल्यावर शहरवासीयांचा विश्वास आहे. यापुढेही नगर परिषद कारभार आपल्या हातातूनच व्हावा, असे त्यांनी यावेळी सांगितले. मात्र, नगराध्यक्ष साळगावकर यांनी मी अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. लवकरच निर्णय घेईन. तो निर्णय शहरवासीयांच्या हिताचाच असेल असे सांगितले. तसेच शिवसेनेतूनच नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे संकेत मंत्री केसरकर यांना अप्रत्यक्ष दिल्याचे समजते. (वार्ताहर)योग्य तो निर्णय घेणारनगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीबाबत बबन साळगावकर यांना विचारले असता, लवकरच मी योग्य तो निर्णय घेईन. तसेच शहरवासीयांसाठी तो अपेक्षित निर्णय असेल असे त्यांनी सांगितले. मात्र, मंत्री केसरकर यांच्याशी झालेल्या चर्चेबाबत माहिती देण्यास स्पष्ट नकार दिला.