शहरं
Join us  
Trending Stories
1
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
2
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
3
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
4
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
5
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
6
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
7
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
8
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
9
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
10
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
11
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

बाबा वर्दम, अक्षरसिंधु कलामंचला प्रथम क्रमांक

By admin | Updated: January 2, 2016 08:29 IST

नाथ पै एकांकिका स्पर्धा : आचरेकर प्रतिष्ठानच्यावतीने कणकवली येथे आयोजन

कणकवली : येथील वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित नाथ पै एकांकिका स्पर्धेच्या खुल्या गटात कुडाळ येथील बाबा वर्दम थिएटर्सची ‘अ‍ॅक्ट’ एकांकिका तर शालेय गटातून कणकवली येथील अक्षरसिंधु साहित्य कलामंचची ‘प्लॉट नं. शून्य, कचराकुंडी जवळ’ ही एकांकिका पहिली आली आहे.नाथ पै एकांकिका स्पर्धेचा निकाल बुधवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आला. त्यानंतर स्पर्धेचे परिक्षक भालचंद्र कुबल, विजय नाईक, नीलकंठ कदम यांच्या उपस्थितीत तसेच जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्या हस्ते विजेत्यांच्या गौरव करण्यात आला.या एकांकिका स्पर्धेतील खुल्या गटातून ‘आरर्टीफिशिअल इंटेलीजन्स’-(अक्षरसिंधु, कणकवली) ही द्वितीय, तर ‘१० वाजून १० मिनिटे’ (समर्थ कलाविष्कार ग्रुप, देवगड) यांची एकांकिका तृतीय आली आहे. दिग्दर्शनासाठी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पुढीलप्रमाणे अमित देसाई - अ‍ॅक्ट (बाबा वर्दम कुडाळ), स्वानंद देसाई - क्रॉर्निक डार्क (द ग्रेट मराठा थिएटर्स, रत्नागिरी), सिद्धार्र्थ साळवी - सायलेंन्ट स्क्रीम (कलाअंकुर मालवण). तांत्रिक अंगे - अनुक्रमे तीन क्रमांक - बुरगुंडा - चंद्रभागा थिएटर्स कणकवली, माणूस माझा गाव-महाशाळा कलासंगम गोवा, सायलेन्ट स्क्रीम कलाअंकुर मालवण. अभिनय - पुरूष अनुुक्रमे तीन क्रमांक भूमिका पीयुष - नीलेश पवार (आरर्टीफिशिअल इंटेलिजन्स), बाबा-सागर माने (मुक्तीधाम - हेरंब नाट्यग्रुप दापोली), राजेंद्र - राजेंद्र बोडेकर (१० वाजून १० मिनिटे). अभिनय मुली अनुक्रमे तीन क्रमांक मुलगी-तन्वी मुडंले (अ‍ॅक्ट), मुक्ता - शुभदा पवार (सायलेंन्ट स्क्रीम), सोनल - सोनल उतेकर - (१० वाजून १० मिनिटे). उत्तेजनार्थ - सौरभ कुलकर्णी (क्रोर्निक डार्क), अनंत लवंदे (माणुस माझे गाव), अन्वी वैद्य (मुक्तीधाम),ऐश्वर्या साठे (क्रोर्निक डार्क). कै. मामा वर्रेकर स्मृती लेखन पुरस्कार - योगसिद्धार्थ पराडकर, अभिषेक कोयंडे (१० वाजून १० मिनिटे).शालेय गट - सांघिक द्वितीय, झेप (बहुरूपी कलामंच कोल्हापूर), रेस : २ (सेक्रेड आर्टस स्कूल कल्याण). दिग्दर्शन अनुक्रमे सुहास वरूणकर-प्लॉट नं शून्य (अक्षरसिंधु), ललिता शिंदे- झेप (बहुरूपी कलामंच कोल्हापूर), सुरेश शेलार - रेस : २ (सेक्रेड आर्टस स्कूल कल्याण).तांत्रिक अंगे अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक- झुळुक (शिरगाव हायस्कूल), प्लॉट नं शून्य (अक्षरसिंधु), झेप (बहुरुपी कलामंच कोल्हापूर). अभिनय मुलगे -अनुक्रमे भूमिका सावकार - हेरंब देशपांडे (सावकाराची व्हान-आरतीप्रभूू कला अकॅडमी कुडाळ), मुलगा, चोर, अनाऊन्सर - जयराज कुडाळकर (सावकाराची व्हान), कचऱ्या - राज बाने (प्लॉट नं शून्य, अक्षरसिंधु). अभिनय मुली - भूमिका झुंबी - श्रेया दुधगावकर (झाडवाली झुंबी, शिंदे अकॅडमी कोल्हापूर), पिल्लू - सुमुखी टेंबे (झेप, बाबा वर्दम) माकडीन - सई कांबळे (रेस २ कल्याण), उत्तेजनार्थ - ऋग्वेद भोईर (रेस २), श्रेयस बागवे (तमसोमा जोर्तिमय) अवंतिका कवढेकर (झुंबी) यशश्री माळी (प्लॉट नं. शून्य) यांनी यश मिळविले आहे.यावर्षी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने या स्पर्धेतील द्वितीय पारितोषिक पुरस्कृत केले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा बँक कटिबद्ध आहे. यापुढेही जिल्हा बँकेचे कला क्षेत्रासाठी योगदान असेच राहील, असे सतीश सावंत यांनी सांगितले. परिक्षक भालचंद्र कुबल यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक वामन पंडीत व सूत्रसंचालन शरद सावंत यांनी केले. (वार्ताहर)