शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

बाबा मोंडकर यांनी मोडली पक्षशिस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 23:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमालवण : मालवणच्या तालुकाध्यक्ष बदलावरून झालेल्या गैरसमजातून वाद निर्माण झाला. तालुका सरचिटणीस यांना जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी निर्णय ‘जैसे थे’ ठेवण्याच्या सूचना दिल्यानंतर बाबा मोंडकर यांनी सहानुभूती मिळविण्यासाठी प्रमोद जठार यांच्यावर आरोप केले. त्यामुळे जिल्हाध्यक्षांविरोधात भाष्य करणाºया बाबा मोंडकर यांनी पक्षशिस्त मोडली असल्याने त्यांच्याविरोधात वरिष्ठ पातळीवर चौकशी अहवाल ...

लोकमत न्यूज नेटवर्कमालवण : मालवणच्या तालुकाध्यक्ष बदलावरून झालेल्या गैरसमजातून वाद निर्माण झाला. तालुका सरचिटणीस यांना जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी निर्णय ‘जैसे थे’ ठेवण्याच्या सूचना दिल्यानंतर बाबा मोंडकर यांनी सहानुभूती मिळविण्यासाठी प्रमोद जठार यांच्यावर आरोप केले. त्यामुळे जिल्हाध्यक्षांविरोधात भाष्य करणाºया बाबा मोंडकर यांनी पक्षशिस्त मोडली असल्याने त्यांच्याविरोधात वरिष्ठ पातळीवर चौकशी अहवाल देण्यात येणार आहे. त्यानंतर वरिष्ठ त्यांच्यावरील शिस्तभंगाबाबत निर्णय घेतील, अशी माहिती भाजप प्रवक्ते काका कुडाळकर यांनी दिली.भाजपचे माजी तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर यांनी तालुकाध्यक्ष बदलावरून जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्याविरोधात भाष्य केल्याने भाजपची जिल्हास्तरीय चौकशी समिती मालवणात आली होती. या समितीने बाबा मोंडकर तसेच पदाधिकाºयांची भूमिका जाणून घेतली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत कुडाळकर यांनी मालवण तालुकाध्यक्ष पदावरून उठलेले वादळ शमले आहे. नवे तालुकाध्यक्ष विजय केनवडेकर यांच्या नेतृत्वाखाली एकसंध व एकदिलाने काम करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले.यावेळी भाजपचे बबलू राऊळ, जयदेव कदम, प्रभाकर सावंत, विजय केनवडेकर, आप्पा लुडबे, गणेश कुशे, भाऊ सामंत, बबलू राऊत, महेश मांजरेकर, धोंडी चिंदरकर, पूजा सरकारे, विकी तोरसकर, राहुल कुलकर्णी, उल्हास तांडेल यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.कुडाळकर म्हणाले, बाबा मोंडकर यांना तालुकाध्यक्ष बदलाबाबतची कल्पना देण्यात आली होती. जिल्ह्यातील कणकवली, सावंतवाडी, दोडामार्ग व मालवण या ठिकाणच्या तालुकाध्यक्ष बदलाबाबत कोअर कमिटीत निर्णय झाला होता. तालुकाध्यक्ष बदलाबाबत पक्षात लोकशाही व कार्यकर्त्यांचे मूल्यांकन असे दोन निकष आहेत. त्यामुळे कोअर समितीच्या मूल्यांकनानुसार मोंडकर यांच्या जागी केनवडेकर यांची निवड करण्यात आली आहे. तालुका कार्यकारिणी बरखास्त करण्यात येणार नाही. तालुका दौरा झाल्यानंतर जिल्हाध्यक्ष जठार यांच्या सूचनेनुसार पुढील निर्णय घेण्यात येईल.पक्षशिस्त मोडल्याचा ठपकाबाबा मोंडकर यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्यावर गंभीर आरोप केले. मोंडकर यांचे हे आरोप स्वार्थासाठी व मच्छिमार समाजाची सहानुभूती मिळविण्यासाठी आहेत. त्यांनी जिल्हाध्यक्षांवर केलेले आरोप पक्षशिस्त मोडणारे असल्याने त्यांनी पक्षशिस्त मोडल्याचा चौकशी अहवाल वरिष्ठांकडे पाठविला जाईल, असे जयदेव कदम यांनी सांगितले, तर पुढील कारवाईबाबत वरिष्ठच निर्णय घेतील, असे राजू राऊळ यांनी सांगितले.