रत्नागिरी : जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांत सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी ५३.८३ टक्केमतदान झाले आहे. पुढच्या एका तासातील मतदानाचा विचार करता सुमारे ६० ते ६२ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी आज, बुधवारी सायंकाळी उशिरा आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला. सर्वाधिक मतदान चिपळुणात, तर रत्नागिरीत सर्वांत कमी मतदान झाले.मतदानास सकाळी सात वाजल्यापासून प्रारंभ झाला. सुरुवातीच्या दोन तासांत ग्रामीण तसेच शहरी भागातही मतदानाचा वेग चांगला होता. सकाळी दहानंतर हा वेग काहीसा मंदावला. सकाळी सात ते नऊ या वेळेत दापोली, गुहागर, चिपळूण, रत्नाागिरी आणि राजापूर या पाचही तालुक्यांत सरासरी २५ टक्के मतदान झाले. यात रत्नागिरी आणि चिपळुणात अधिक मतदान झाले. सुरुवातीला मतदान वेगात झाल्याने पुढेही हे प्रमाण वाढेल, असा अंदाज व्यक्त होेत होता; मात्र, पुन्हा एक वाजेपर्यंत / ातदान संथगतीने झाले. त्यामुळे सात ते एक या वेळेत जिल्ह्याचे एकूण ३५.८ टक्के मतदान झाले. सायंकाळच्या शेवटच्या दोन तासांत मतदानाने काहीसा वेग घेतला. मतदान सुरू झाल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात एकूण ६,७६,०५८ (५३.८३ टक्के) मतदारांनी आज मतदानाचा हक्क बजावला.यात पुरुषांची संख्या ३ लाख २८ हजार ७७२, तर महिला मतदारांची संख्या ३ लाख ३८ हजार २८६ इतकी आहे. एकूण मतदारांची संख्या लक्षात घेता पुरुष मतदारांची टक्केवारी ५५.९ टक्के इतकी आहे, तर महिलांची टक्केवारी ५१.९६ टक्के इतकी आहे. काही ठिकाणी मतदानयंत्रांत झालेले किरकोळ बिघाड वगळता अन्यत्र मतदान शांततेत पार पडले.पाचही मतदारसंघांतील नियोजित ठिकाणी रविवारी (दि. १९) सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी होणार असल्याचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)..तर संन्यास भास्कर जाधव यांचा पराभव न केल्यास राजकारणातून संन्यास घेण्याचा निश्चय गुहागर मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार संदीप सावंत यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केला.ंमतदारसंघटक्केदापोली५४.०२गुहागर५५.३३चिपळूण५९.०९रत्नागिरी४६.४९राजापूर५४.८७सरासरी५३.८३
रत्नागिरीत सरासरी ६२ टक्के मतदान
By admin | Updated: October 16, 2014 00:51 IST