शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

‘वेंगुर्ला ९’ लागवडीसाठी उपलब्ध

By admin | Updated: November 5, 2015 23:55 IST

नवीन जात : काजू सुधार प्रकल्प योजनेची वार्षिक कार्यशाळा

वेंगुर्ले : काजू सुधार प्रकल्प योजनेच्या वार्षिक कार्यशाळेत देशभरातील ६0 काजू पिकावर काम करणाऱ्या शास्त्रज्ञांनी सहभाग घेऊन एकूण ३२ काजूपीक सुधारणा विषयक निर्णय घेतले. संकर ३0३ ही नवीन जात ‘वेंगुर्ला ९’ या नावाने राष्ट्रीय पातळीवर लागवडीसाठी वितरित करण्यात आली.प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात अखिल भारतीय समन्वित काजू सुधार प्रकल्प योजनेची वार्षिक कार्यशाळा झाली. या कार्यशाळेत ‘वेंगुर्ला ९’ ही नवीन काजूची जात लागवडीसाठी वितरित केली. या जातीच्या झाडाचा विस्तार अतिशय आटोपशीर असून, झाडाला घोसाने फलधारणा होणे हे याचे वैशिष्ट्य आहे. या जातीचे सरासरी उत्पन्न प्रती झाड १५.९८ किलोग्रॅम एवढे असून, एका किलोमध्ये ११२ काजू बिया मावतात. तसेच गराचे प्रमाण अधिक असून काजू बीचे सरासरी वजन ८.९ ग्रॅम एवढे आहे. ही जात टी मॉस्किटो या किडीला ‘वेंगुर्ला ४’ या जातीच्या तुलनेत कमी प्रमाणात बळी पडते. ही जात बदलत्या हवामानात सुद्धा काजूचे चांगले उत्पन्न देते. या जातीची कलमे पुढील दोन वर्षांत मोठ्या प्रमाणावर प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ले येथे शेतकऱ्यांकरिता उपलब्ध होणार आहेत. कार्यक्रमाच्या तिसऱ्या दिवशी कृषी महाविद्यालय दापोलीचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुभाष चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली काजू बागायतदार, कृषी विभागातील अधिकारी व कार्यशाळेला उपस्थित असणारे शास्त्रज्ञ यांचे चर्चासत्र आयोजित केले होते. यावेळी शेतकऱ्यांनी विचारलेल्या काजूपीक विषयक समस्यांना उपस्थित शास्त्रज्ञांनी समर्पक माहिती देऊन त्यांच्या समस्यांचे निराकरण केले. या कार्यक्रमाचा समारोप संशोधन संचालक डॉ. उत्तम महाडकर यांच्या अध्यक्षतेखाली व भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे डॉ. टी. जानकीराम, काजू प्रकल्प समन्वयक डॉ. पी. एल. सरोज यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. विविध सत्रामध्ये घेतलेल्या निर्णयाचे वाचन होऊन त्यावर चर्चा करण्यत आली. वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. बी. आर. साळवी यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)