शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

सत्ताधाऱ्यांनी सूड भावनेने काम करू नये : कन्हैया पारकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 16:40 IST

कणकवलीतील सत्ताधारी आणि अधिकाऱ्यांनी कोणाच्या बाबतीतही सूड भावनेने काम करू नये, ते सहन केले जाणार नाही, असा इशारा कन्हैया पारकर यांच्यासह विरोधी नगरसेवकांनी दिला आहे. कणकवली येथील शासकीय विश्रागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी गटनेते सुशांत नाईक, रूपेश नार्वेकर, सुजित जाधव, प्रसाद अंधारी आदी उपस्थित होते.

ठळक मुद्देसत्ताधाऱ्यांनी सूड भावनेने काम करू नये : कन्हैया पारकर हर्णे यांनी नौटंकी करू नये

कणकवली : कणकवलीतील सत्ताधारी आणि अधिकाऱ्यांनी कोणाच्या बाबतीतही सूड भावनेने काम करू नये, ते सहन केले जाणार नाही, असा इशारा कन्हैया पारकर यांच्यासह विरोधी नगरसेवकांनी दिला आहे. कणकवली येथील शासकीय विश्रागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी गटनेते सुशांत नाईक, रूपेश नार्वेकर, सुजित जाधव, प्रसाद अंधारी आदी उपस्थित होते.

कणकवली शहरातील आरक्षित जमीन खरेदी विक्रीच्या प्रकरणांची चौकशी करण्यात यावी. तसेच नगरपंचायत आरक्षित जमिनींचे खरेदी-विक्री व्यवहार होऊ शकतात का? याची माहिती मुख्याधिकाऱ्यांनी जनतेला द्यावी. शहरातील भाजी मार्केट तसेच पार्किंग आरक्षणातील जमीन खरेदी करून बंडू हर्णे भागधारक बनले आहेत. ते आरक्षण विहित मुदतीत विकसित करण्याचा करार नगरपंचायतीशी करूनही अद्याप त्याची पूर्तता झालेली नाही. मात्र, नगरपंचायत प्रशासनाने बंडू हर्णे यांच्या प्रकरणात एक भूमिका तर उमेश वाळके यांच्या प्रकरणात दुसरी भूमिका घेतली आहे,  असे कन्हैया पारकर म्हणाले.

पारकर म्हणाले, सत्ताधारी नगरसेवक बंडू हर्णे यांनी आरक्षण क्रमांक ४८ संदर्भात घेतलेल्या भूमिकेचे स्वागतच आहे. मात्र शहरातील आरक्षणे वाचवायची होती. तर मग भाजी मार्केट व पार्किंग आरक्षणे विकासकामार्फत विकसित करण्याची भूमिका का घेतली? नगरपंचायतीने आरक्षण स्वत: विकसित करण्यासंदर्भात ठराव घेतलेला असतानादेखील बंडू हर्णे यांनी जमिनी खरेदी करून त्या आरक्षणातील जमिनींचे भागधारक ते बनले आहेत.आरक्षण विकसित करण्यासंदर्भात नगरपंचायतीशी २०१७ मध्ये करार करण्यात आला. २ वर्षांत नगरपंचायतीला आरक्षित जमिनीवरील ५ हजार १८४ चौरस मीटरचे क्षेत्र विकसित करून ते देणार होते. त्याचे काय झाले? त्यामुळे बंडू हर्णे यांनीच स्वत: कराराचे उल्लंघन केले आहे.

या पार्किंग आरक्षणासंदर्भात झालेल्या ठरावानंतर मी जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील केले. त्यामुळे या करारात ठरावाचा उल्लेख करून परवानगी देण्याची प्रक्रिया करण्यात आली. तरी देखील पार्किंग आरक्षणच्या बोगस प्लॅन विरोधात मी कोकण आयुक्तांकडे अपील केले. त्यामुळे विकास शुल्क भरूनही त्यांना परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे बंडू हर्णे यांनी नगरपंचायत हिताची काळजी असल्याचे विनाकारण भासवून नौटंकी करू नये, असा टोला कन्हैया पारकर यांनी लगावला. ते म्हणाले, आरक्षण क्रमांक ४८ बसस्थानकासाठी आरक्षित होते. एसटीने जमीन घेण्यास नकार दिला़. त्यावेळी बंडू हर्णे नगरपंचायतीच्या सत्तेत होते.त्याचवेळी त्यांनी आरक्षण बदलाची मागणी करण्याची आवश्यकता होती. मात्र, तसा पत्रव्यवहार केलेला नाही. आता फक्त सूड भावनेतून बांधकाम परवानगी देण्याबाबत सत्ताधारी काम करीत आहेत.गायकवाडांना सल्लाजर आरक्षणाच्या माध्यमातून जनतेचा फायदा त्यांना करून द्यायचा होता तर मग नगरपंचायतीच्या आरक्षणातील जमीन घेणाऱ्या पोदार स्कूलकडून कणकवली शहरातील नागरिकांना फीमध्ये २५ ते ५० टक्के सूट का देण्यात आली नाही. त्यामुळे या पुढील काळात तरी निदान रवींद्र गायकवाड आणि सत्ताधाºयांनी मुलांच्या फी सवलतीसाठी प्रयत्न करावेत, असेही पारकर यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Politicsराजकारणsindhudurgसिंधुदुर्ग