शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

रंगतदार लढतीकडे शहरवासीयांचे लक्ष

By admin | Updated: November 15, 2016 00:47 IST

प्रसन्ना कुबल यांना विरोधकांचे तगडे आव्हान : काँग्रेसच्या कृतिका कुबल यांचीही कसोटी

वेंगुर्ले : वेंगुर्ले नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक ३ मध्ये राष्ट्रवादीने जागा रिक्त सोडल्याने काँग्रेस, शिवसेना, भाजप व अपक्ष यांच्यात लढत होणार आहे. माजी नगराध्यक्ष प्रसन्ना कुबल व सामाजिक कार्यकर्ते विवेक कुबल आमने-सामने ठाकल्याने ही लढत रंगतदार बनली आहे. दोघांपैकी कोणाला मतदार पसंती दर्शवितात, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.येथील प्रभाग क्रमांक ३ मध्ये भाजप, शिवसेना व काँग्रेसचे प्रत्येकी दोन, तर अपक्ष एक, असे सात उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत. प्रभाग ३ अ मध्ये सर्वसाधारण महिला गटात शिवसेनेच्या वृंदा मोर्डेकर, भाजपच्या अ‍ॅड. सुषमा प्रभुखानोलकर, तर काँग्रेसच्या कृतिका कुबल यांचा समावेश आहे. मोर्डेकर व प्रभुखानोलकर हे उमेदवार अनुभवी असून, काँग्रेसच्या कुबल या यंदा प्रथमच निवडणूक रिंगणात आहेत. अ‍ॅड. सुषमा प्रभुखानोलकर या मागच्यावेळी भाजपतर्फेच ५९३ मतांनी नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. यंदा शिवसेनेतर्फे उभ्या राहिलेल्या वृंदा मोर्डेकर या त्यावेळी त्यांच्या प्रमुख विरोधक होत्या. यंदाच्या निवडणुकीत पुन्हा मोर्डेकर व प्रभुखानोलकर एकमेकांच्या विरोधात उभ्या राहिल्या आहेत. वृंदा मोर्डेकर यांचे आजेसासरे कै. मामा मोर्डेकर हे पूर्वीच्या काळी वेंगुर्ले नगरपरिषेदेचे नगराध्यक्ष म्हणून निवडून आले होते. मोर्डेकर व प्रभुखानोलकर यांचा जनसंपर्क मोठा आहे. या दोन जुन्या उमेदवारांविरोधात काँग्रेसने नवख्या कृतिका कुबल यांना उभे केले आहे. त्यामुळे प्रभाग ३ अ मध्ये सर्वसाधारण महिला गटासाठी तिरंगी लढत होणार आहे.प्रभाग क्रमांक ३ ब सर्वसाधारण गटात भाजपचे प्रसन्ना कुबल, शिवसेनेचे विवेक कुबल, काँग्रेसचे विधाता सावंत व अपक्ष म्हणून वेंगुर्ले गॅसचे वितरक नंदन वेंगुर्लेकर यांचा समावेश आहे. माजी नगराध्यक्ष प्रसन्ना कुबल व सामाजिक कार्यकर्ते विवेक कुबल हे आमने-सामने आले असून, तसेच प्रभाग ३ मध्ये कुबलवाडा येत असल्याने येथून कोणाला जास्त मताधिक्य मिळते, हे महत्त्वाचे ठरणार आहे. प्रसन्ना कुबल हे यापूर्वीही नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तर विवेक कुबल व नंदन वेंगुर्लेकर हे यापूर्वी अपयशी ठरले होते. काँग्रेसचे नवखे उमेदवार विधाता सावंत हे यंदा पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. घाडीवाडा येथे त्यांचा प्रचंड मित्रपरिवार आहे. तसेच सावंत हे युवा शक्ती प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास गावडे यांचे मित्र आहेत. त्यामुळे एकूणच ही लढत मोठ्या प्रतिष्ठेची होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)प्रभाग क्रमांक ३ मधील उमेदवार तुल्यबळ असून, त्यांचा जनसंपर्कही चांगला असल्याने उमेदवार निवडण्यासाठी मतदारांपुढे आत्मपरीक्षणाची गरज निर्माण झाली आहे.