शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

दारू विक्रेत्यावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 22:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्कदेवगड : देवगड तालुक्यातील मालपे ग्रामस्थांनी गोवा बनावटीची दारू आणून ती विकणाºया कार चालकासह सोमवारी सकाळी ६ वाजता अडविली. याबाबत विचारणा करीत ग्रामस्थांंनी केलेल्या हल्ल्यात कारच्या काचा फुटल्या. ग्रामस्थांचा उद्रेक पाहून कारचालक विलास हुन्नरे याने तेथून पळ काढला. मात्र विजयदुर्ग पोलिसांनी त्याला कणकवली येथूनताब्यात घेतले. गोवा बनावटीच्या दारूचेबॉक्स ...

लोकमत न्यूज नेटवर्कदेवगड : देवगड तालुक्यातील मालपे ग्रामस्थांनी गोवा बनावटीची दारू आणून ती विकणाºया कार चालकासह सोमवारी सकाळी ६ वाजता अडविली. याबाबत विचारणा करीत ग्रामस्थांंनी केलेल्या हल्ल्यात कारच्या काचा फुटल्या. ग्रामस्थांचा उद्रेक पाहून कारचालक विलास हुन्नरे याने तेथून पळ काढला. मात्र विजयदुर्ग पोलिसांनी त्याला कणकवली येथूनताब्यात घेतले. गोवा बनावटीच्या दारूचेबॉक्स घेणाºया शंकर समजीसकर या दाम्पत्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याचबरोबर कार व ४0 हजार रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली आहे.कणकवली येथील विलास रामचंद्र हुन्नरे (वय ६४) हा त्याच्या मालकीच्या कारने सोमवारी सकाळी गोवा बनावटीच्या दारुचे बॉक्स घेऊन मालपे येथे जात होता. सकाळी ६ वाजण्याचा सुमारास मालपे-गावठणवाडी येथे तेथीलच शंकर लक्ष्मण समजीसकर (५0) व त्याची पत्नी स्वाती शंकर समजीसकर (४५) हे दोघे त्याच्या गाडीतील दारूचे बॉक्स खाली उतरून घेत असताना लोकांनी पाहिले. त्यांनी याबाबत चालक विलास हुन्नरे याला विचारणा केली. यावरून ग्रामस्थांशी त्याची बाचाबाची झाली. ग्रामस्थांनी आक्रमक होत गाडीच्या काचाही फोडल्या. यामुळे चालक हुन्नरे हा घाबरून तेथून पळाला. त्यानंतर ग्रामस्थांनी मालपे पोलीस पाटील विलास गोपाळ सुतार यांच्याशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली.पोलीस पाटील सुतार यांनी विजयदुर्ग पोलीस स्टेशनला याबाबत कळविल्यानंतर पोलीस नाईक आगा, गुणीजन, महिला कॉन्स्टेबल मिठबांवकर, चालक कदम यांनी घटनास्थळी जाऊन कार ताब्यात घेतली. गाडीमधील गोवा बनावटीची ४0 हजार रूपये किमतीची दारू ताब्यात घेण्यात आली. विजयदुर्ग पोलिसांनी कार व दारुसहीत सुमारे १ लाख ९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.या प्रकरणातील पळून गेलेला संशयित विलास हुन्नरे याला विजयदुर्ग पोलिसांनी कणकवली येथून तर शंकर समजीसकर व त्याच्या पत्नीला मालपे तिठा येथून ताब्यात घेतले आहे. बेकायदेशीररित्या गोवा बनावटीच्या दारुची वाहतूक करणे, दारू ताब्यात बाळगणे व विक्री करणे याप्रकरणी विलास हुन्नरे, शंकर समजीसकर व स्वाती समजीसकर या तिघांविरूध्द गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. याबाबतचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण करीत आहेत.कारच्या काचा फोडल्याजोपर्यंत दारू व्यावसायिकांवर कारवाई होत नाही तोपर्यंत गाडी तसेच दारुसाठा पोलिसांच्या ताब्यात न देण्याचा पवित्रा मालपे ग्रामस्थांनी घेतला होता. मालपे-गावठणवाडी येथे गोवा बनावटीच्या दारुचे बॉक्स गाडीतून उतरवित असताना पाहिल्यानंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी कारच्या काचाही फोडल्या.महिलांचा रूद्रावतारया मोहिमेत महिलांचा पुढाकार मोठ्या प्रमाणात आढळून आला. यावेळी वाहनचालक आणि मालपे ग्रामस्थ यांच्यात शाब्दिक बाचाबाचीदेखील झाली. या महिलांनी आक्रमक होत जोपर्यंत पोलीस अधीक्षक घटनास्थळी येत नाहीत आणि संबंधितांवर कारवाई करीत नाहीत तोपर्यंत दारूसाठा पोलिसांच्या ताब्यात दिला जाणार नाही, अशी भूमिका घेतल्यामुळे वाहनचालकाने चप्पल आणि चष्मा गाडीत ठेवूनच कणकवलीच्या दिशेने पलायन केले.