शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्टाचार उघड केल्याने हल्याचा कट, सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकरांचा खळबळजनक दावा

By अनंत खं.जाधव | Updated: January 9, 2024 16:00 IST

कटात बांधकाम अधिकाऱ्यांचा समावेश

सावंतवाडी : आंबोली घाटरस्ता भ्रष्टाचार प्रकरणात आपण आवाज उठविल्याच्या रागातून अधिकारी व ठेकेदारांची एका हॉट मिक्स प्लांटवर पार्टी झाली. या पार्टीत आपल्यावर हल्याचा कट रचण्यात आला असून या कटाचा सूत्रधार सार्वजनिक बांधकामचा एक अधिकारीच असल्याचा खळबजनक दावा सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.ते सोमवारी सावंतवाडीत बोलत होते. यावेळी त्यांनी असे किती ही हल्याचे प्रयत्न झाले तरी मागे हटणार नसून आंबोली घाट रस्ता भ्रष्टाचाराचा कशाप्रकारे हब झाला हे पुराव्यानिशी उघड करणार असल्याचे सांगितले आहे. यावेळी माजी नगरसेवक उमाकांत वारंग, विलास जाधव, सुरेश भोगटे, अफरोज राजगुरू, महादेव राऊळ उपस्थित होते.साळगावकर म्हणाले, काही दिवसापूर्वी मी व माझ्या सर्व सहकाऱ्यांसमवेत पोलिस ठाण्यात अर्ज दिला होता.यात मागील दहा वर्षांत आंबोली घाटात झालेला भ्रष्टाचार उघड व्हावा अनेक ठिकाणी कामे न करता पैसे काढण्यात आले असून याची पूर्णपणे चौकशी व्हावी अशी मागणी केली होती. या मागणी नंतर पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी हा अर्ज दाखल करून घेत बांधकाम विभागांकडून तशी माहितीही  घेण्यास सुरुवात केली आहे.मात्र बांधकाम विभाग सध्या ही माहीती देण्यास टाळाटाळ करीत आहे. पण मी गप्प बसणार नाही.याचा छडा लागला पाहिजे म्हणून सतत पाठपुरावा करणार असल्याचे साळगावकर यांनी स्पष्ट केले आहे.दरम्यान हा भ्रष्टाचार उघड करत असल्यानेच आठवड्या पूर्वी काहि ठेकेदार व बांधकाम विभागातील एक अधिकारी यांच्यात एक बांदा येथे पार्टी झाली या पार्टीत माझ्यावर हल्ला करण्याचा कट रचण्यात आला आहे.याची माहिती मला लागली त्यानंतर याबाबत मी स्वता पोलिसांना माहिती दिली असून कोणताही तक्रार अर्ज दिला नाही.तसेच ज्या बांधकाम विभागांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा कट रचण्यात आला तो अधिकारी बरीच वर्षे एकाच ठिकाणी असून त्याची चौकशी व्हावी अशी मागणी ही आपण बांधकाम विभागाकडे करणार असल्याचे साळगावकर यांनी यावेळी स्पष्ट केले.यापूर्वी ही माझ्यावर असे हल्ले झाले असून मी अशा हल्याना घाबरत नाही पण जे भ्रष्टाचाराचे प्रकरण हाती घेतले ते तडीस लावणार असा इशारा ही साळगावकर यांच्याकडून देण्यात आला आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गSawantwadiसावंतवाडी